बिहारच्या बाप-लेकीची कमाल; कोरोना युद्धात डॉक्टरांच्या मदतीसाठी बनवला रोबोट

कोरोना रुग्णाचं निदान ते त्याची काळजी घेण्यापर्यंत सगळी कामं करणारा रोबोट; रिअल टाइम डेटा आणि डेटा बेससह चाचणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पटना: कोरोनाला कसं संपवायचं या विचारात देश-विदेशातील मोठे शास्त्रज्ञ गुंतले आहेत. जरी अनेक कोरोना प्रतिबंधक लसी आल्या आहेत, तरी डॉक्टर्स, नर्सेस यांची कमतरता आपल्याला भासतेय. या उणीवा दूर करण्यासाठी बिहारच्या एका मुलीने वडिलांच्या मदतीने रोबोट बनविला. त्याची वैशिष्ट्य ऐकल्यास तुम्ही थक्क व्हाल.

जेवणापासून ते ऑक्सिजन सगळं देणार रोबोट

पटना येथील अभियांत्रिकीची विद्यार्थिनी आकांक्षा हिने वडील योगेश कुमार यांच्या मदतीने एक रोबोट तयार केला आहे. हा रोबोट अशी असंख्य कामं करू शकतो, ज्यासाठी माणसाची गरज आहे. एखाद्या संक्रमित रुग्णाला जेवण द्यायचं किंवा ऑक्सिजन देण्याचं काम हा रोबोट करू शकतो.

रिअल टाइम डेटा आणि डेटा बेससह चाचणी

आकांक्षा म्हणाली की हा रोबोट कोणत्याही संक्रमित रूग्ण, असहाय व्यक्तीची दूरस्थपणे आणि रिअल टाईम डेटा आणि डेटा बेससह मूलभूत वैद्यकीय तपासणी करू शकतो. रोबोटच्या मदतीने रक्तातील ग्लूकोजचं प्रमाण, रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण, रक्तदाब, हृदय गती इत्यादी तपासल्या जाऊ शकतात. रोबोटच्या माध्यमातून हाय रिझोल्यूशन नाईट व्हिजन कॅमेऱ्यातून 360 डिग्री फिरवून रूग्ण आणि हॉस्पिटलाचं परीक्षण, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, हाय रिझोल्यूशन कॅमेऱ्याच्या माध्यमातून डॉक्टर आणि रुग्णादरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधता येतो. याशिवाय क्यूआर कोडच्या मदतीने ई-प्रिस्क्रिप्शनची सुविधादेखील आहे.

बाप-लेकीच्या जोडीने राष्ट्रीय स्तरावर ओळख बनविली

कॅबिनेट मंत्री रविशंकर प्रसाद, एम्स पटनाचे डॉक्टर अशा अनेक डॉक्टरांनी आकांक्षाचं कौतुक केलं आहे. यापूर्वी अनेक नाविन्यपूर्ण कामं करून बाप-लेकीच्या या जोडीने राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख बनविली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!