अरे बापरे! नव्या कोरोना स्ट्रेनच्या रुग्णांत वाढ

मंगळवारी आढळले होते 6 रुग्ण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : 70 टक्के जास्त वेगानं पसरणाऱ्या नव्या कोरोना स्ट्रेनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी 6 भारतीयांना लागण झाल्याचं समोर आलं होतं. दरम्यान आता हा आकडा 20 वर पोहोचला आहे. ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

आतापर्यंत डेनमार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलीया, इटली, फ्रान्स, स्‍वीडन, स्वीत्झर्लंड, स्‍पेन, कॅनाडा, जर्मनी, लेबनॉन, जपान आणि सिंगापूर या देशांमध्ये नव्या कोरनाचा शिरकाव झाला आहे. त्यांनतर तो भारतातही आला आहे. भारतात आढळलेल्या 20 रुग्णांपैकी ३ जण बंगळुरु दोन हैदराबाद आणि एक रुग्ण पुणे येथील आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये एका मुलीलासुद्धा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. ही मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत ब्रिटनहून भारतात परतलेली आहे.

सासष्टीत 400 जण ब्रिटनहून परतले

सासष्टीत यूकेहून चारशेजण परतले. त्यातील ३५० जणांचा शोध लागलाय. यातील ज्यांना लागण झाल्याचं समोर आलं, त्यांना तातडीनं आयसोलेट करण्यात आलंय. सासष्टीतील मामलेदार, तहसीलदार आणि इतर प्रशासकीय यंत्रणेला सध्या यूकेहून आलेल्यांच्या मागावर आहेत. त्यांची ओळख पटवून त्यांच्या कोरोना चाचणी घेण्याचं आव्हानात्मक काम सध्या या सगळ्यांवर आहे.

आतापर्यंत राज्यात 46 जण पॉझिटिव्ह

यूकेहून आलेल्या आतापर्यंत ४६ जणांना बाधा झाल्याचं समोर आलंय. मात्र त्यांना नव्या कोरोनाची लागण झाली आहे का, उघड होऊ शकलेलं नाही. त्यांना सध्या ईएसआय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांतील बहुतेकांना कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाही. मात्र जोपर्यंत पुण्याहून रिपोर्ट येत नाही, तोवर त्यांना आयसोलेशनमध्येच रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.

शोधायचं कसं?

दरम्यान अनेक शहरांमध्ये ब्रिटनहून परतलेल्या रुग्णांना ट्रेस करण्यात अडचणीही येत असल्यानं चिंता वाढली आहे. मागील 15 दिवसांत ब्रिटनमधून पुण्यात काही नागरिक आले आहेत. एकूण 109 नागरिकांचा येथील प्रशासन सोध घेत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!