पद्मश्री डॉ. प्रकाश आमटेंच्या खांद्याची शास्त्रक्रिया

डॉ. प्रकाश आमटेंचा मुलगा अनिकेत आमटेंनी दिली माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे 3 ऑगस्ट 2021 रोजी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटेंच्या खांद्याची शास्त्रक्रिया करण्यात आली. अनेक वर्षांच्या अंग मेहनतीने आणि वय वाढल्याने मसल कमजोर होऊन तुटला होता. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉ. प्रकाश आमटेंचा मुलगा अनिकेत आमटे यांनी दिली.

हेही वाचाः काँग्रेसकडून गोव्यासाठी वरीष्ठ निवडणूक निरीक्षक म्हणून चिदंबरम यांची नियुक्ती

2012 मध्ये उजव्या खांद्यावर झाली होती शस्त्रक्रिया

72 व्या वर्षी सुद्धा रोज बाबांचं वन्यप्राण्यांशी खेळणं आणि त्यांना खाऊ घालणं सुरू असतं. डाव्या हाताच्या खांद्यावर डॉ. आशिष बाभुळकर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 2012 मध्ये उजव्या खांद्यावर अशीच यशस्वी शत्रक्रिया डॉ. बाभुळकर यांनी केली होती. दीनानाथ हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. धनंजय केळकर यांचे आणि बाबांचे अनेक वर्षांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सगळं चांगलं झालं. दोन दिवसांत बाबांना सुट्टी मिळाली. त्यांना पूर्ण बरं व्हायला 2 महिने लागतील. त्या नंतर फिजिओथेरपी सुरू होईल, अशी माहिती अनिकेत आमटेंनी दिली.

तोपर्यंत तुमचं प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद असाच असू द्या

पुण्यात आणि देशात कोरोना अजूनही असल्यानं फारसं कोणाला या शस्त्रक्रियेबद्दल कळवलं नाही. डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की कोरोनाचे नियम पाळा. गर्दी होऊ देऊ नका. आनंदवन सोमनाथ लोक बिरादरी प्रकल्प अजूनही पर्यटकांसाठी बंद आहे. पावसाळा संपल्यावर दिवाळीच्या सुमारास कोरोनाची परिस्थिती बघून प्रकल्प सुरू करण्यात येईल. तोपर्यंत तुमचं प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद असाच असू द्या. काळजी घ्यावी. लोभ असावा, अशी विनंती अनिकेत आमटेंनी केलीये.

दोन रियल हिरो एकत्र

डॉ. प्रकाश आमटे यांच्यावर चित्रित झालेल्या ‘प्रकाशवाट’ या चित्रपटात डॉ. प्रकाश आमटेंची भूमिका साकारलेले आनंदवन प्रेमी नाना पाटेकर डॉ. आमटेंना हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी डॉ. आमटेंच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली तसंच त्यांनी लवकर बरं व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी दोन रियल हिरो एकत्र दिसते.

हेही वाचाः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा 9 वा हप्ता जारी

हा व्हिडिओ पहाः Video | Sattari Landslide | जंगल तोडून अतिक्रमण केल्यामुळे डोंगर कोसळला?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!