म्युकरमायकोसिसपासून बचावासाठी स्टिरॉईडसचा अतिरेक टाळावा

डॉ. राजीव जयदेवन यांची माहिती; रक्तशर्करा नियमित तपासावी; पत्र सूचना कार्यलायातर्फे वेबिनार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मधुमेह आणि स्टिरॉईडसचा अप्रमाणात वापर यामुळे प्रतिकारक शक्ती कमकुवत होते, त्यामुळे म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य संसर्गाची लागण होण्याची शक्यता जास्त निर्माण होते, अशी माहिती केरळ भारतीय वैद्यकीय परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी दिली. डॉ राजीव जयदेवन आणि दंतचिकित्सक डॉ. नीता यांनी पत्र सूचना कार्यलायाने आयोजित केलेल्या ‘कोविड-19, म्युकरमायकोसिस आणि दातांची स्वच्छता’ या विषयावरील वेबिनारमध्ये मार्गदर्शन केलं.

हेही वाचाः भाजपायुमो वास्को मंडळातर्फे आयुर्वेदीक औषधांचे वितरण

स्टिरॉईडसचा वापर टाळा, रक्तशर्करा नियमित तपासा

पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात या संसर्गाची लागण जास्त दिसून येते. कारण आपल्याकडे स्व-उपचारावर अजूनही जास्त भर दिला जातो. कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मधुमेह रुग्णांनी नियमित रक्तशर्करा तपासावी तसंच स्टिरॉईडसचा वापर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. रक्तातील साखर वाढल्यास रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. ज्यामुळे, न्युट्रोफिलसारख्या पांढऱ्या पेशींवर परिणाम होतो. कोविड रुग्णांच्या तुलनेत म्युकरमायसोसिस रुग्णांचं प्रमाण अगदीच नगण्य असल्याचं, डॉ. जयदेवन म्हणाले.

हेही वाचाः स्थानिकांचा विरोध असल्यास तरंगत्या जेटीचं स्थलांतरण

म्युकरमायकोसिस असंच संबोधणं योग्य

बुरशी गोड पदार्थ आणि जस्तावर लवकर वाढते. बुरशी आपल्या पेशींवर हल्ला करते. त्यामुळे पेशी मृत होतात, त्यावेळी त्यांचा रंग काळा होतो. यामुळे याला काळी बुरशी असं साधारणपणे म्हटलं जातं. मात्र, कोणत्याही रंगावरुन याला नाव देण्यापेक्षा म्युकरमायकोसिस असंच संबोधणं योग्य असल्याचं डॉ. जयदेवननी सांगितलं.

हेही वाचाः रेस्टॉरंट्स, ब्यूटी पार्लरही बँकेकडून कर्ज काढू शकणार

स्व-उपचार हे म्युकरमायसोसिसला आमंत्रण

कोविड संक्रमणात लक्षणविरहीत रुग्णांनी औषधोपचार टाळावा. योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि अगदीच आवश्यकता भासल्यास पॅरासिटीमलचा वापर कराव. स्व-उपचार हे म्युकरमायसोसिसला आमंत्रण आहे. मात्र, 5-6 दिवसानंतर जर लक्षणांमध्ये वाढ झाली, जसं थकवा जाणवणं, श्वसनास त्रास होणं, जेवणाची इच्छा न होणं, छातीत दुखणं किंवा अस्वस्थ वाटणं, तर तुम्ही रुग्णालयात जावं किंवा डॉक्टरांशी फोनवरून संपर्क करावा, असा सल्ला डॉ. जयदेवननी दिला.

हेही वाचाः कोवॅक्सिन, स्पुतनिक वी नको, परदेशी विद्यार्थ्यांनी WHO नं मंजुरी दिलेलं वॅक्सिन घ्यावं

याविषयी अभ्यास सुरू

लसीकरणामुळे प्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे आपसूकच म्युकरमायकोसिसपासून बचाव होतो,  असं आतापर्यंत दिसून आलं आहे. त्यामुळे लसीकरण महत्त्वाचं आहे. कोरोना संक्रमणातून बरे झालेल्या रुग्णांनी काही आठवड्यांपर्यंत स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांत असं आढळून आलंय, की मधुमेह रुग्ण आणि अवयव प्रत्यारोपण केलं नाही, अशांमध्येही म्युकरमायसोसिचा संसर्ग आढळून आला आहे, हा नवीन प्रकार असून याविषयी अभ्यास सुरू असल्याचं डॉ. जयदेवन म्हणाले.

हेही वाचाः VIDEO VIRAL: द ग्रेट खलीच्या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स

सर्वच वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्याची आवश्यकता नाही

वाफ घेऊन कोणताही विषाणू मरत नाही. उलट, शरीरात उपयोगी असलेल्या जीवाणूंना याचा फटका बसतो. वाफ घ्यायची असल्यास अगदी सौम्य घ्यावी, तसंच त्यात कोणतीही पानं वा घटक यांचं मिश्रण करू नये. बुरशी ही आपल्या आसपासच्या सर्वच घटकांवर असते. बुरशी शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहे. त्यामुळे एकदम घाबरुन सर्वच वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्याची आवश्यकता नसल्याचं डॉ. जयदेवननी सांगितलं.

हेही वाचाः 100 टक्के लसीकरण केलेलं पहिलं राज्य होण्याचं गोव्याचं उद्दिष्ट

दोन वेळा दातांची स्वच्छता महत्त्वाची

बुरशी कोणत्याही अस्वच्छ घटकावर वाढते. त्यामुळे नैसर्गिक जीवाणू सुरक्षित ठेवून बुरशीपासून संरक्षणासाठी नियमितपणे दोन वेळा दातांची स्वच्छता, माऊथवॉशचा वापर करणं आवश्यक आहे. दात काढल्यानंतर ती जागा आणि एकूण तोंडाची स्वच्छता महत्त्वाची आहे, असं दंतचिकिस्तक डॉ नीता यांनी कोविड-19 संक्रमण परिस्थितीत दाताच्या आरोग्याविषयी बोलताना सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!