कोरोना लसीनंतर देशात दोघांचा मृत्यू! महत्त्वाच्या घडामोडींचा झटपट आढावा एका क्लिकवर

देशभरात काय घडलंय? वाचा फटाफट

Goan Varta Live | प्रतिनिधी

देशात कोरोना लस दिलेल्या दोघांचा मृत्यू

यूपी आणि कर्नाटकातील दोघांचा कोरोना लसीकरणानंतर मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यातील यूपीत मृत्यू झालेल्याच्या मृत्युचं कारण कोरोना लस नसल्याचं पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलंय. तर कर्नाटकात मृत्यू झालेल्याचा पोस्टमॉर्टेम केल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट केलं जाणार आहे.

अरेरे! TOP 5 मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपचा एकही नाही

महाराष्ट्र – ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा गुलाल

महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं आहे. सत्ताधारी पक्षांनी साम, दाम, दंड अशा सर्व पद्धतींचा उपयोग केला. पण तरी देखील भाजपाची विजयी घौडदोड ते रोखू शकले नाहीत. १४ हजार पैकी ६ हजार पेक्षाही अधिक पंचायतींमध्ये भाजपा नंबर १ असेल, असा विश्वास भाजपा प्रवक्ते केवश उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

महाराष्ट्राचा राजकीय रंग – थोडक्यात महत्त्वाचं

भाजपची सरशी, मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटलांच्या गावात शिवसेनेचा भगवा फडकला

चंद्रकांत पाटलांपाठोपाठ भाजप नेते रावसाहेब दानवे यांना भोकरदन तालुक्यात धक्का

जळगाव – तालुक्यातील भादली येथील तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील विजयी

सिंधुदुर्ग – सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या दिपक केसरकर यांना दे धक्का, भाजपाचा विजय

सिंधुदुर्ग : नितेश राणेंनी वैभववाडीचा गड राखला

मालवणमध्ये आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का, 6 पैकी 5 ग्रामपंचायतींमध्ये भाजपची एकहाती सत्ता

रत्नागिरीच्या दापोलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खातं उघडलं

एकच नंबर! वयाच्या अवघ्या 21 वर्षी बनणार महापौर

सासू विरुद्ध सून आणि जावई विरुद्ध सासरा

ग्रामपंचायत निवडणुकीत काही मजेशीर लढत पाहायला मिळाली. औरंगाबाद जिल्ह्यातील धोंधलगावात चक्क सासू विरोधात सुनेने तर जावई विरोधात सासऱ्याने निवडणुकीत उडी घेतली होती. शिवशाही पॅनलकडून सासू गोकर्णा आवारे आणि जावई लक्ष्मण काळे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर छत्रपती ग्रामविकास पॅनलकडून सून कल्याणी आवारे आणि सासरे रावसाहेब वैद्य एकमेकांच्या विरोधात होते. त्यामुळे सासूच्या विरोधात सूनान आणि सासऱ्याच्या विरोधात जावईनं निवडून येण्याचं दावा केला होता मात्र काहीवेळापूर्वी आलेल्या निकालानुसार सून सून कल्याणी आवारे यांनी आपल्या सासू गोकर्णा आवारे यांचा पराभव केला आहे.तर दुसरीकडे जावई लक्ष्मण काळे यांनी सासरे रावसाहेब वैद्य यांचा पराभव केला आहे.

शिवरायांनी ताठ मानेनं जगायला शिकवलं!

अर्णब आणि व्हॉट्सअप चॅट

रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी अध्यक्ष पार्थ दासगुप्ता यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटची संयुक्त संसदीय समितीकडून (जेपीसी) चौकशी करा, अशी मागणी काँग्रेसने केंद्र सरकारकडे केली आहे.

सुशांत सिंह राजपूत अपडेट

कुठल्याही प्रकरणाचा तपास चालू असताना प्रसारमाध्यमांनी स्वतःला हवा तो निष्कर्ष काढल्यास (मीडिया ट्रायल), त्याचा परिणाम खऱ्या तपास यंत्रणेच्या तपासावर होतो, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी पुन्हा सुरू झाली आहे.

खळबळजनक विधान

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या इस्लामी दहशतवादी आहेत. त्यांच्या राज्यात विधानसभा निवडणुका होताच त्यांना बांगलादेशमध्ये निर्वासित म्हणून जावे लागेल, असं विधान उत्तर प्रदेश मंत्री आनंद स्वरुप शुक्ल यांनी केलं आहे.

जगाला धंद्याला लावून चीन फायद्यात

चीनची अर्थव्यवस्था २०२० मध्ये २.३% वाढली असल्याचं वृत्त ब्लुमबर्गने दिलंय. २०२०मध्ये कोरोनमुळे सगळ्यांना आर्थिक फटका बसला. मात्र चीनला फायदा झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

पेट्रोलचा भडका

पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी केलेल्या इंधन दरवाढीने दिल्लीत पेट्रोल दर रेकॉर्ड स्तरावर गेला आहे. सोमवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी २५ पैसे वाढ केली यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर ८४.९५ रुपये झाला आहे. मुंबईत पेट्रोल ९१.५६ रुपयांच्या सार्वकालीन उच्चांकावर आहे.

ऑनलाईन भामटा जेरबंद

तब्बल २२ हजार महिलांना सोशल मीडियावर जाहिराती देऊन फसविणाऱ्या सायबर भामट्याला सायबर पोलिसांनी काल अटक केली. हा तरुण मूळचा गुजरातमधील असून त्याने परदेशात संगणक क्षेत्रातील शिक्षण घेतले आहे. या भामट्याने सुमारे ७० लाखांचा चुना लावल्याचे तपासातून पुढे आले आहे.

पसंतीने केलेला विवाह कुणीही रोखू शकत नाही!

लसीकरणानं पॅरालिसीसचा अटॅक

इस्रायलमधील १३ जणांना करोनाची लस घेतल्यानंतर फेशीयल पॅरलिसिस म्हणजेच चेहऱ्याच्या भागात अर्धांगवायूचा झटका आल्याचे वृत्त आहे. इस्रायलमधील आरोग्य विभागाने अशाप्रकारे लसीचे साइड इफेक्ट दिसणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे. अनेकजण करोना लसीच्या या साईड इफेक्टमधून बाहेर आले असले तरी त्यांना हा त्रास जाणवल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. “मला जवळजवळ २८ तास फेशियल पॅरलिसिसचा त्रास जाणवत होता,” असं एका व्यक्तीने सांगितलं. मात्र नंतर आपण यामधून बाहेर आल्याचेही तिने स्पष्ट केलं.

अखेरच्या दिवशी टीम इंडियाची कसोटी

टीम इंडियापुढे विजयासाठी ३२८ धावांचं आव्हान असणार आहे. मंगळवारी अखेरच्या दिवशी सामना जिंकून मालिका खिशात घालण्या टीम इंडिया उत्सुक असेल. तर पावसानं खोडा घातल्यास सामना अनिर्णित राहण्याचीही दाट शक्यताय. अखेरचा सामना रंगतदार स्थितीत आला असून काय होतं, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय.

या महत्त्वाच्या घडामोडी शेअर करायला विसरु नका! वाचत राहा गोवन वार्ता लाईव्ह.

हेही वाचा –

धारवाड अपघातातून बचावलेल्या तिनं सांगितलं की, जाग आली तेव्हा मैत्रिणींचे मृतदेह….

Video भर मैदानात क्रिकेट खेळताना हार्टअटॅक दोघांचा मृत्यू

नर्स, वॉर्डबॉय पदासाठी गोव्याच्या शेजारील राज्यात मोठी पदभरती

खासगी डेटा वाचवण्यासाठी WhatsApp डिलीट करणं, हाच एकमेव मार्ग उरलाय?

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!