Video | जुना विक्रमही मोडीत! सोमवारी 1 लाखापेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद, 478 जणांचा मृत्यू

आरोग्य यंत्रणेसमोरची चिंता वाढली

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णवाढीचा उद्रेकानं सोमवारी नवा उच्चांक गाठलाय. देशात सोमवारी तब्बल एक लाखापेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. देशातील कोरोना संकट गंभीर झालं असल्याची जाणीव देणारी ही आकडेवारी असून या नव्या रुग्णवाढीनं आरोग्य यंत्रणेची चिंता अधिक वाढली आहे. देशात कोरोनानं पाऊल ठेवल्यापासून पहिल्यांदाच २४ तासांतविक्रमी रुग्णसंख्येनं कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेच. कोरोनाच्या पहिल्या लाटेत १६ सप्टेंबर २०२० रोजी देशात एका दिवसांतील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली होती. रुग्णसंख्येचा हा विक्रमही सोमवारी समोर आलेल्या आकडेवारीने मोडीत काढलाय. गेल्या २४ तासांत देशात १ लाखांहून अधिक नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेत.

हेही वाचा – महाराष्ट्रात कडक निर्बंध; तूर्तास लॉकडाऊन नाही

Corona Covid 19 India Tally

जवळपास ५०० जण दगावले

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या, मृत्यू आणि लसीकरण झालेल्या नागरिकांची आकडेवारी जाहीर केली आहे. रविवारी दिवसभरात देशात १ लाख ३ हजार ५५८ नवीन रुग्ण आढळून आलेत. तर ५२ हजार ८४७ जण कोरोनावर मात करून घरी परतलेत. या २४ तासांच्या कालावधीत देशात ४७८ म्हणजे जवळपास ५०० जणांचा मृत्यू झालाय. देशात आतापर्यंत १ लाख ६५ हजार १०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

हेही वाचा – कणकवली कोविड सेंटरमध्ये गलथान कारभार

corona death 800X450

नकोसा विक्रम!

देशात एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशात सर्वाधिक ९७ हजार ८९४ रुग्ण आढळून आले होते. १६ सप्टेंबर २०२० रोजी या विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली होती. देशात कोरोनाचा सर्वाधिक संक्रमणाचा काळ असताना ही नोंद झाली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र संसर्गाचा वेग प्रचंड वाढलाय. कुटुंबातील एका व्यक्तीला संक्रमण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबालाच विषाणूची लागण होत असल्याचं आढळून आलंय.

हेही वाचा – कोविड योद्धे म्हणतात शबय, शबय! पगारवाढीच्या घोषणेची वर्षपूर्ती

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!