मुंबई, पुण्यात इलेक्ट्रिक बस पुरवणाऱ्या ऑलेक्ट्राच्या निव्वळ नफ्यात वाढ…

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुंबई : ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (Olectra) या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीने 30 जून 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत रु. 304.7 कोटींचा महसूल नोंदवला आहे, जो मागच्या वर्षीच्या तिमाहीत रु. 41.2 कोटी होता. महसुलात 640 टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. या तिमाहीत 169 इलेक्ट्रिक बसेसच्या मागणीची पुर्तता करण्यात आली.
हेही वाचा:भाजपच्या युवा नेत्याची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या…
पुणे बस संचालनातून उत्तम उत्पन्नाची नोंद
मागच्या वर्षीच्या तिमाहीत फक्त 11 बसेसची डिलेव्हरी होउ शकली होती. चालू तिमाहीत कंपनीच्या पुणे बस संचालनातून उत्तम उत्पन्नाची नोंद झाली आहे. करानंतरचा नफा 825.2 टक्क्यांनी Y-o-Y आधारावर वाढून 18.8 कोटी झाला आहे जो मागील वर्षीच्या याच कालावधीत फक्त रु.2.0 कोटी होता. EBITDA 8.7 कोटींच्या तुलनेत 322.6 टक्क्यांनी वाढून 36.8 कोटी झाला आहे. करपूर्व नफा (PBT) 799.9 टक्क्यांनी वाढून रु. 24.7 कोटी इतका झाला आहे. कंपनीने 18.8 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. इन्सुलेटर डिव्हिजनने 30 जून 2022 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ४२ टक्क्यांची वाढ महसुलात नोंदवली आहे.
हेही वाचा:मासळी खरेदी करुन ट्रॉलर मालकाला घातला १.२४ कोटी रूपयांचा गंडा…
“आम्ही वेगाने ई-बस निर्मिती केल्याने 169 एवढ्या विक्रमी बसेसचे वितरण करू शकलो. हा प्रगतीचा आलेख कायम ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करू. आम्ही विविध STUs मध्ये वितरण वाढवले आहे, आणि आम्ही वितरण वेळापत्रकांचे पालन करू. आम्ही नवीन उत्पादनाची श्रेणी सादर करू आणि अधिक विभागांमध्ये प्रवेश करू.
के.व्ही.प्रदीप, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऑलेक्ट्रा