LOCKDOWN | निर्णय: ओडिशामध्ये 14 दिवसाचं लॉकडाउन

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सरकारकडून निर्णय; 5 ते 19 मे पर्यंत निर्बंध

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोरोनाने देशात धुमाकूळ घातलंय. दररोज कोरोनाची नवनवी प्रकरणं समोर येत आहेत. ओडिशामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर 14 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. ओडिशा सरकारचे नवीन पटनायक यांनी May 5 मे ते 19 मे पर्यंत ओडिशामध्ये लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 

हेही वाचाः कोविड व्यवस्थापन कृतीदलाकडे सोपवा

ओडिशात रुग्ण संख्येत वाढ

ओडिशामध्ये दररोज कोरोनाची 8 ते 9 हजार प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. सध्या ओडिशामध्ये कोरोना बाधितांची संख्या 4 लाख 54 हजार 607 वर गेली आहे आणि आतापर्यंत 2 हजार 54 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. ओडिशात सध्या 61 हजार 505  सक्रिय रुग्ण आहेत आणि उपचारानंतर 3 लाख 91 हजार 048  लोक बरे झाले आहेत.

हेही वाचाः धमकीचे फोन | बड्या लोकांकडून दबाव…

14 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर देशात हॉस्पिटल्स, बेड, व्हेंटीलेटर, औषधं, ऑक्सिजन यांची कमतरता भासू लागली आहे. ओडिशातील कोरोना संक्रमितांची वाढती संख्या पहता ओडिशा सरकारने अखेर 14 दिवसांचा लॉकडाउन घोषित केलाय. या लॉकडाऊनमध्ये महत्त्वाच्या सेवा सोडून इतर सर्व गोष्टी बंद असतील.

हेही वाचाः CAR ON FIRE | मडगावात कारला आग

काळजी घ्या

कोरोना पासून जर वाचायचं असेल तर सरकारने घालून दिलेली नियमावलीतं पालन प्रत्येकाने करण्याची गरज आहे. मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग करणं आणि हातांची स्वच्छता राखणं गरजेचं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!