Vaccine सर्टिफिकेटवर झाली असेल चूक, तर घाबरू नका…

CoWin पोर्टलवरून करू शकता दुरूस्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लसीकरण सुरू आहे. लसीकरणासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे. रजिस्ट्रेशन करताना स्वतःची वैयक्तिक माहिती देण्यास काही चूक झाली असेल, तर घबरण्याचं काही कारण नाही. तुम्ही ती चूक दुरूस्त करू शकता. तर जाणून घ्या CoWin पोर्टलवरून तुम्ही कशा प्रकारे चूक दुरूस्त करू शकता. कोरोना व्हॅक्सिन घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करताना नाव, जन्म तारीख किंवा लिंग चुकीचे लिहिलं असेल तर दुरूस्त करू शकता.

हेही वाचाः भाजप याही वेळी अव्वल ; तब्बल 750 कोटींच्या राजकीय देणग्या !

सर्टिफिकेटवर देखील माहिती चुकीची असल्यास तुम्ही  CoWin पोर्टलवरून माहितीमध्ये बदल करू शकता. पण तुम्ही फक्त एक वेळाच माहिती अपडेट करू शकता. त्यानंतर तुम्ही अपडेट सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता. 

हेही वाचाः कोरोना संक्रमित बालकांसाठी नवी गाइडलाइन

माहितीमध्ये कशी कराल दुरूस्ती

– सर्वप्रथम CoWin पोर्टल (cowin.gov.in)ला भेट द्या.
– त्यानंतर मोबाईल नंबर टाकून लॉग-इन करा
– अकाउंड डिटेल खाली असलेल्या Raise an Issue वर क्लिक करा.
– मेंबरचं नाव सिलेक्ट झाल्यानंतर Correction in Certificateवर क्लिक करा. 
– त्यानंतर तुम्ही नाव, जन्म तारीख किंवा लिंग यामध्ये बदल करू शकता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!