NORTH-EAST LEGISLATIVE ASSEMBLY ELECTION 2023: मेघालयातील निकालानंतर ‘हे’ समीकरण आकार घेऊ पाहतेय, ‘असे’ झाल्यास भाजप सत्तेपासून दूर फेकला जाऊ शकतो !

मेघालय निवडणूक निकाल 2023: NPP कडे देखील भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे मोठे कारण आहे. कारण भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत भाजपने निवडणुकीपूर्वीच एनपीपी सोडली होती.

ऋषभ | प्रतिनिधी

Meghalaya Assembly Election 2023: मेघालय और नागालैंड में 27 फरवरी को होगी  वोटिंग, मैदान में हैं BJP, NPP, TMC और कांग्रेस के प्रत्याशी - Meghalaya  Assembly Election 2023 Nagaland 27 ...

निवडणूक निकाल 2023:  देशातील तीन राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर आता निकाल समोर येत आहेत. त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजप मजबूत दिसत असताना मेघालयमध्ये भाजपसाठी चांगली बातमी नाही. इथे भाजपला 10 चा आकडाही स्पर्श करता आलेला नाही. यावेळी भाजपने राज्यातील युती तोडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळेच भाजप सत्तेपासून दूर राहू शकतो. भाजपचे  हेमंत बिस्वा सरमा आता मत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबीत असले तरी सत्तेची चावी एनपीपीच्या हातात आहे. मेघालयमध्ये कोणती समीकरणे आकारास येत आहेत ते जाणून घेऊया.

NPP भाजपसाठी सत्तेची कवाडे पुनः उघडेल का?


मेघालयमध्ये विधानसभेच्या एकूण 59 जागांवर निवडणुका झाल्या, ज्याचे निकाल समोर येत आहेत. एनपीपीने 25 जागा काबिज केल्याचे दिसत आहे. त्याचवेळी भाजप 3 जागांवर आल्याचे दिसत आहे. दूसरा मोठा पक्ष UDP ठरला आहे ,TMC 5 , कॉंग्रेस 5 , अन्य 10 अशा जागा विभागल्या गेल्या आहेत. आता अशा स्थितीत यावेळी एनपीपी इतर कोणत्याही पक्षाशी युती करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवू शकते, असेही निवडणूक जाणकार सांगत आहेत. NPP भाजपचा पाठिंबा न घेता UDP आणि इतर पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करू शकते. 

एनपीपीकडेही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे मोठे कारण आहे. कारण भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत भाजपने निवडणुकीपूर्वीच एनपीपी सोडली होती. भाजप एकट्याने निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले होते. अशा स्थितीत हात सोडलेल्या भाजपचे एनपीपी पुन्हा स्वागत करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

पण हिमंता बिस्वा सरमा यांची मुत्सद्देगिरी चर्चेचा विषय ठरेल


निवडणुकीपूर्वी भाजपने एनपीपीला सोडचिठ्ठी दिली असली तरी नंतरचे वातावरण पाहता पुन्हा मैत्रीचा हात पुढे केला. निकालापूर्वी हिमंता बिस्वा सरमा यांनी मुख्यमंत्री कोनराड संगमा यांची भेट घेतली. निवडणुकीनंतर युतीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. आता संगमा आणि बिस्वा यांच्या बैठकीत कोणता फॉर्म्युला निश्चित झाला आहे हे स्पष्ट झालेले नाही. पण निवडणुकीतला विजय हा निकालांवर नाही तर बंद दरवाज्या आड झालेल्या निर्णयांवर ठरतो, हे आम्ही मागील अनेक निवडणुकांमध्ये पाहिले आहे.

 

केंद्रात सत्तेचे समीकरण


मेघालयाबाबतही एक समीकरण असे आहे की केंद्रात राहणाऱ्या पक्षाचे येथे अधिक वर्चस्व आहे. म्हणजेच मुख्यमंत्री कोनराड संगमा इतर कोणत्याही प्रादेशिक पक्षाला सोबत घेण्याऐवजी सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी करणे पसंत करू शकतात. त्यामुळेच भाजपच्या वतीने हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडे वाटाघाटीची कमान सोपवण्यात आली आहे. सरमा यांनी आतापर्यंत भाजपला निराश केले नाही, त्यामुळे मेघालय सरकारमध्ये भाजपची उपस्थिती नाकारता येणार नाही. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!