FASTAG | नो फास्ट टॅग, भरा दुप्पट टोल

भारतातील सर्व राष्ट्रीय महामार्गावरील टोलवर आजपासून फास्ट टॅग अनिवार्य

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरोः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व गाड्यांना फास्ट टॅग अनिवार्य केले आहे. याची अंमलबजावणी आजपासून म्हणजेच १५ फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे. आजपासून फास्ट टॅग अनिवार्य झाला आहे. फास्ट टॅग नसेल तर तुम्हाला दुप्पट टोल टॅक्स भरावा लागेल.

….तर दुप्पट टॅक्स भरावा लागेल

जर तुमच्या गाडीवर फास्ट टॅग लावले नसेल तुम्हाला मार्शल लेनमध्ये प्रवेश मिळणार नाही. मात्र जर तुम्ही फास्ट टॅगच्या लेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या गाडीचा जेवढा टॅक्स असेल त्याच्या दुप्पट टॅक्स भरावा लागेल.

एनएचएआयच्या म्हणण्यानुसार….

सध्याचा टोल पेमेंटमध्ये फास्टॅगचा हिस्सा सुमारे ७५ ते ८० टक्के आहे जो सरकारला १०० टक्के करायचा आहे. यामुळे सरकार १५ फेब्रुवारीनंतर याची मुदत वाढवणार नाहीत.

काय आहे फास्ट टॅग?

फास्ट टॅग एक स्टिकर आहे जे तुमच्या गाडीच्या विंडस्क्रिनवर लावले जाते. हे स्टीकर कारच्या विंडशिल्डच्या आत लावले जाते. यात बारकोड असतो. डिवाईस रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन टेक्नोलॉजीचा वापर यात केला जातो, जी टोल प्लाझावरील स्कॅनरला कनेक्ट असते. गाडी पास झाल्यानंतर तुमच्या फास्ट टॅग अकाऊंटमधील पैसे कट होतात. फास्ट टॅगला तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डला जोडू शकता. ज्या ज्या ठिकाणी टोल लागेल तेव्हा तुमच्या अकाऊंटमधून पैसे कट होतील.

कसे खरेदी कराल फास्ट टॅग?

फास्ट टॅग देशभरातील कोणत्याही टोल बुथवर खरेदी करता येते. फास्ट टॅग खरेदी करण्यासाठी तुमच्या गाडीच्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्ससह आयडीची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस  बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, पेटीएम पेमेंट्स बँक आणि आयडीएफसी फर्स्ट आदि बँकांसह 22 बँकांमधून खरेदी करू शकता. याशिवाय पेटीएम, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही तुम्ही फास्ट टॅग खरेदी करू शकता. अनेक बँकांनी आपल्या मोबाईल अ‍ॅपवर फास्ट टॅग खरेदीवर डिस्काऊंट, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर दिले आहे. यासाठी ही http://www.fastag.org/apply-online वेबसाईटही तयार करण्यात आली असून इथे जाऊनही तुम्ही फास्टॅग अर्ज करू शकता. अधिक माहिती मिळवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या 1033 या हेल्पलाईनवर फोन करता येईल.

किती आहे फास्ट टॅगची किंमत?

फास्ट टॅगची किंमत दोन बाबींवर अवलंबून आहे. तुमच्याकडे वाहन कोणते आहे आणि तुम्ही कुठून फास्ट टॅग खरेदी करता यावर त्याची किंमत अवलंबून आहे. इश्यू फी आणि सिक्युरिटी डिपॉझिटची किंमत प्रत्येक बँकेची वेगळी असू शकते. फास्ट टॅग तुम्ही घरबसल्या खरेदी करू शकता.

कसे कराल रिचार्ज?

जर फास्ट टॅग एनएचएआय प्रीपेड वॉलेटशी जोडले असेल तर याला रिचार्ज करता येते. हे युपीआय/डेबिट या क्रेडिट कार्ड/एनईएफटी/नेट बँकिंग आदि माध्यमातून रिचार्ज करू शकता. जर बँक खाते फास्ट टॅगशी जोडले असेल तर पैसे खात्यातून कट होतील. तुम्ही पेटीएम वॉलेटला फास्ट टॅगशी जोडल्यास वॉलेटमधून तुम्ही रिचार्ज करू शकता.

वैधता किती?

फास्ट टॅग खात्यात मिनिमम बॅलन्सची अनिवार्यता आता काढून टाकण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार रिचार्ज करू शकता. फास्ट टॅगची वैधता जारी झाल्यापासून पाच वर्षं आहे. रिचार्ज केल्यानं ही वैधता वाढत नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!