बिहारमध्ये पुन्हा नितीशराजच!

बिहार एनडीएच्या नेतेपदी निवड : मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पटना : बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री तथा जेडीयूचे नेते नितीश कुमार (Nitish Kumar) यांची बिहार राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी निवड करण्यात आल्यामुळे ते मुख्यमंत्री होतील, यावर शिक्कामोर्तब झालंय. सोमवारी सकाळी शपथविधी होणार आहे. नितीश कुमार सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळतील.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन तर्क-वितर्क लढवले जात होते. भाजपला जास्त जागा मिळाल्याने नितीश कुमार यांच्या हातातून मुख्यमंत्रीपद निसटणार अशी शक्यता होती. भाजप नेत्यांनी एकीकडे नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील असं स्पष्ट केलं असताना नितीश कुमार यांनी मौन बाळगलं होतं. अखेर एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करत चर्चांना पूर्णविराम देण्यात आला.

बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासंबंधी भाजप, जेडीयू, हिंदुस्तानी आवाम मोर्चा (एचएएम) आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) यांची नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली.

बिहारमध्ये एनडीएने 122 जागांसहित बहुमत मिळवलं आहे. भाजपला 74 जागा मिळाल्या आहेत. नितीश कुमार यांच्या पक्षाला 43 जागांवरच विजय मिळवता आला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!