आशियातल्या सर्वात लांब बोगद्याच्या उद्घाटनाची तारीख जाहीर करत गडकरी म्हणाले…

मंगळवारी केली पहाणी; या बोगद्यामुळे लेह ते श्रीनगर हे अंतर तीन तासांनी कमी होणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील आशियातील सर्वात लांब झोजिला बोगद्याचा आढावा घेतला. या बोगद्यामुळे लेह ते श्रीनगर हे अंतर तीन तासांनी कमी होणार आहे. झोजिला बोगदा ऑल वेदर रोड कनेक्टिव्हिटी अंतर्गत बांधला जात आहे.

बोगद्याचे काम अतिशय वेगाने सुरू

मंत्री नितीन गडकरी म्हणाले, बोगद्याचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. आम्हाला आशा आहे की ते २३ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि पंतप्रधान २६ जानेवारी रोजी त्याचे उद्घाटन करतील. हा बोगदा बनवण्यासाठी उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. शिमला ते रोहतांग मार्गे लेह, झोजिला, सोनमार्ग ते श्रीनगर या मोठ्या बोगद्याचं काम सुरू आहे. वर्षातील सहा महिने सर्व काही थांबते. अशा स्थितीत येत्या काही दिवसांमध्ये शिमला ते श्रीनगरपर्यंत दळणवळण शक्य होईल. सोनमर्गचा सुमारे ६.५ किमीचा झेड-मोड बोगदा नीलगढ बोगदा आणि झोजिला बोगद्याला जोडला जाईल. यामुळे वाहतूक सुरळीत होईल. या भागात बोगदा बांधल्यामुळे सुमारे तीन ते चार हजार लोकांना रोजगार मिळाला आहे.

सामाजिक-आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा

दुसरीकडे, २,३७८ कोटी रुपये खर्चून बनवलेला झेड-मोर बोगदा सोनमर्गला काश्मीर खोऱ्यात गगनगीरशी जोडेल. अगदी हिवाळ्याच्या हंगामात जेव्हा येथीलल बहुतेक रस्ते मुसळधार बर्फवृष्टीमुळे बंद होतात, हा बोगदा परिसरातील सामाजिक-आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. हिवाळ्याच्या हंगामात जोरदार बर्फवृष्टीमुळे, सोनमर्गचा इतर भागांशी संपर्क तुटतो ज्यामुळे आवश्यक पुरवठा विस्कळीत होतो. यामुळे झेड-मोर बोगदा बांधण्याची गरज होती. सुमारे ८,५०० फूट उंचीवर स्थित झोजिला पास वर्षातून ५-६ महिने बंद राहतो. यामुळे वर्षभरात ५-६ महिने काश्मीरसह लडाखचा संपर्क तुटतो. त्यामुळे, सर्वांगीण आणि सर्व हवामान जोडणीसाठी, सोनमर्ग आणि लडाखला जोडणारा बोगदा बांधण्याची गरज होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!