नकोसा विक्रम! रस्ते अपघातात जगात भारत पहिल्या क्रमांकावर

नितीन गडकरींनी व्यक्त केली अपघातांबद्दल चिंता

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. रस्ते अपघातात भारत जगात पहिल्या क्रमांकावर असं हे चिंताजनक आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय. केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांनी होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात 2025 सालापर्यंत 50% घट होणं सुनिश्चित करण्यासाठी हितसंबंधितांनी सर्वसमावेशक प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. अपघातांबाबतची परिस्थिती चिंताजनक असल्याचं सांगत ते म्हणाले की, रस्ते अपघातात जगात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत.

अमेरिका आणि चीनच्याही पुढे भारत असल्यानं देशातील अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय रस्ते परीसंघाच्या भारत विभागाच्या वतीने झालेल्या ‘भारतातील रस्ते सुरक्षा आव्हाने आणि कृती आराखडा’ या विषयावर सुरू असलेल्या वेबिनार मालिकेच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.

काय आहे आकडेवारी?

देशात दरवर्षी 1.5 लाख लोक मृत्यूमुखी पडतात आणि 4.5 लाख लोक रस्ते अपघातात जखमी होतात. हे प्रमाण दरदिवशी 415 मृत्यू इतके आहे. या अपघातांमुळे देशाच्या राष्ट्रीय जीडीपीच्या 3.14% सामाजिक आर्थिक नुकसान होते आणि मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 70%लोक 18 ते 45 या वयोगटातील असतात, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

त्यांच्या मंत्रालयाने केलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करत गडकरी म्हणाले की,

सुधारीत अभियांत्रिकी, शिक्षण, अंमलबजावणी ,आपत्कालीन सेवा या काही मंत्रालय उपाय योजना या प्रश्नांच्या मुकाबल्यासाठी घेतल्या आहेत. ते म्हणाले की मंत्रालयाने महामार्गावरील जाळ्यातील 5000 अपघातप्रवण ठिकाणे शोधून काढली आहेत आणि 40,000 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीच्या रस्त्यांचे सुरक्षिततेसाठी सर्वेक्षण केले जात आहे. रस्त्यावरील सुरक्षिततेच्या जागृती साठी सध्या भारतभर रस्ता सुरक्षा मास पाळला जात आहे. रस्ता सुरक्षिततेच्या सर्व बाबींचा समावेश करणाऱ्या 12 वेबिनार वर्षभर आयोजित करण्यात येणार आहेत.

हेही वाचा –

अर्थसंकल्पाचे थेट संकेत, दारु महागणार कारण…

दोन हजार जणांवर बेकारीची कुऱ्हाड, डिजीटल स्ट्राईकचा फटका

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!