‘नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात’

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं गडकरींचं कौतुक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नांदेड, हिंगोलीनंतर आज ते परभणीत आहेत. राज्यपाल आज वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील प्रशासकीय इमारत भवनात येत आहेत. इथे ते बांबू लागवड प्लॉटला भेट दिली. शिवाय शेतीविषयक अवजारांची पाहणीही केली. यावेळी राज्यपालांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचं तोंडभरुन कौतुक केलं.

हेही वाचाः पोस्टाची भारी योजना; 705 रुपये भरा अन् मॅच्युरिटीवर 17.30 लाख मिळणार

नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस

नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस आहे. दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतो, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. बांबू लागवडीला नितीन गडकरी यांनी प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे त्याचा उपयोग करून घ्या, असा सल्ला कोश्यारींनी विद्यापीठाच्या कुलगुरुंना दिला.

हेही वाचाः ALERT! ‘एचडीएफसी’च्या ‘या’ सेवा आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून बंद

सगळ्यांनी एकत्रित राहा

बांबू लागवडीची पाहणी करताना राज्यपालांनी नितीन गडकरींवर स्तुतीसुमनं उधळली. याशिवाय राज्यपालांनी विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला दिला. पंतप्रधान म्हणतात ‘सब का साथ सब का विकास’ और सबका विश्वास’, याप्रमाणे सगळ्यांनी एकत्रित राहा, असं राज्यपाल विद्यार्थ्यांना म्हणाले.

हेही वाचाः शिवोलीत ४.३० लाखांचे ड्रग्स जप्त

राज्यपालांकडून विकासकामांचा आढावा

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे काल हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. संविधानाने मला जे अधिकार बहाल केले आहेत त्या अधिकारांचा वापर करून मी या जिल्ह्यात आलो आहे, असं ते म्हणाले. त्यांनी सर्व कार्यालयीन प्रमुखांची बैठक घेत जिल्ह्यातील सोयी सुविधा, सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.

हेही वाचाः ROBBERY | फोंड्यात दोघा चोरट्यांना अटक

राज्यपालांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात  

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांचा काल किरकोळ अपघात झाला. राज्यपाल कोश्यारी काल हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी नरसी नामदेवकडे जाताना त्यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांना अपघात झाला. या अपक्षातात 3 गाड्यांचं किरकोळ नुकसान झालं. दरम्यान, या अपघातात कुणालाही गंभीर इजा झाली नाही.

हा व्हिडिओ पहाः Video | Sattari Landslide | जंगल तोडून अतिक्रमण केल्यामुळे डोंगर कोसळला?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!