एsss शाबास! आरोग्य सेतू ऍप कुणी बनवला हे कुणालाच माहिती नाही

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : आरोग्य सेतू ऍप. नाव कुणासाठी नवीन नाही. कोरोना काळात हे ऍप वापरण्यासाठी भल्याभल्या लोकांनी आवाहन केलं. लोकांनीही आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. पण हे ऍप कुणी डेव्हलप केलंय, याचाच कुणाला थांगपत्ता नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे हे ऍप वापरणाऱ्यांची माहिती, त्यांच्या फोनमधील डेटा सुरक्षित आहे की नाही, यावरही तर्क वितर्क लढवले जात आहेत.
आरोग्य सेतूला कुणी जन्माला घातलं?
सेंट्रल इनफॉरमेशन कमिशनने नॅशनल इनफॉरमेशन सेंटरला नोटीस पाठवली आहे. त्यात हा ऍप कुणी डेव्हलप केला, याची माहिती माहिती का नाही, असा सवाल उपस्थित केलाय. त्याबाबत स्पष्टीकरणही मागवण्यात आलंय. फक्त एनआयसीच नव्हे तर अनेकांना याबाबतचं स्पष्टीकरण मागवण्यात आलंय. बड्या चीफ पब्लिक इनफॉरमेशन अधिकाऱ्यांसह नॅशनल इ- गव्हनन्स डिवीजन, इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रोद्योगिक मंत्रालयालाही नोटीस पाठवण्यात आली आहे.
एका आरटीआय कार्यकर्त्यानं याबाबत विचारणा केली होती. त्यावर उत्तर न मिळाल्यानं हा सगळ्या धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. त्यामुळे तुम्ही जर हे ऍप वापरत असाल, तर तुमच्या फोनमधील डेटा सुरक्षित आहे की नाही, याबाबतही शंका उपस्थित केली जातेय.
केंद्रानेच केलेलं प्रमोशन
आरोग्य सेतू ऍप वापरण्याचं आवाहन केंद्राच्या अनेक मंत्र्यांनी केलं होतं. केंद्र सरकारनेच या ऍपच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मोहीमही राबवली होती. खरंतर नॅशनल इनफॉरमेशन सेंटर आणि आईटी मंत्रालयाने आरोग्य सेतूची वेबसाईट तयार केली. पण ऍप कुणी तयार केली याची माहिती तर त्यांच्याकडेही नसल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. एनडीटीव्हीने याबाबतचं वृत्त दिलंय.
आरोग्य सेतूच आजारी?
आत नोटीस पाठवल्यानंतर नेमकं त्याला उत्तर काय मिळतं, हे पाहणं महत्त्वाचंय. दरम्यान, मधल्या काळात केंद्र सरकारनं अनेक ऍप्सववर डिजीटली सर्जिकल स्ट्राईक केला होता. अनेक चिनी ऍप्सला भारतात बंदी घालण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणावरुन ही बंदी घालण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं होतं. मात्र आता आरोग्य सेतू ऍपबद्दलच शंका उपस्थित झाल्यानं चर्चांना उधाण आलंय.
Q: Who created Arogya Setu app?
— Neembu Paani (@bhootkaaal) October 28, 2020
IT Ministry 👇 pic.twitter.com/ngkCMk7HHz
हेही वाचा –
VIDEO VIRAL | दिवंगत पित्यास श्रद्धांजली वाहताना चिराग पासवान ड्रामा करता होते?
अखेर निर्णय झालाच तर! नोव्हेंबरपासून कसिनो उघडणार
महाग कांद्यांची चिंता सोडा! रेशनकार्डवर मिळणार तीन किलो कांदे