बांधकामाच्या निकृष्ट गुणवत्तेबद्दल एनएचएआय अधिकाऱ्यांना दंड करणार

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे नवे धोरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्लीः राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) अधिकारी आणि अभियंते, रस्ते मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकामात गुंतलेल्या इतर एजन्सींना आता कामाची गुणवत्ता आणि बांधकामे तपासण्यात अपयशी ठरल्याबद्दल जबाबदार धरले जाईल, असं ‘एनएचएआय’ने म्हटलं.

हेही वाचाः यंदाच्या गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र सरकारची नियमावली जाहीर

तर, अधिकाऱ्यांना दंड सहन करावा लागणार

कोणत्याही अपयशासाठी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत केवळ कंत्राटदार आणि कामावर देखरेख करणारे सल्लागारांना किंवा स्वतंत्र अभियंत्यांना दंड केला आहे. मात्र आता त्यात बदल करत बांधकामादरम्यान कोणतीही रचना अपयशी ठरल्यास किंवा त्यात पुन्हा अपयश आल्यास अधिकाऱ्यांना मोठ्या किंवा किरकोळ दंड सहन करावा लागणार असल्याचं एनएचएआयने म्हटलंय. या आठवड्यात जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, सिद्ध कार्यपद्धतीचं पालन केलं जात आहे याची खात्री करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने बांधकाम प्रकल्पांची तपासणी करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी असलेल्या प्रभारी अधिकाऱ्यांची असल्याचे नमूद केलं आहे.

बांधकामांमध्ये ‘त्रुटी’ असल्याचे प्रकार समोर

मंत्रालयाच्या मते, गुणवत्ता आश्वासन लागू करण्यासाठी कराराच्या तरतुदी असूनही बांधकाम कंपन्या किंवा कंत्राटदार आणि सल्लागारांच्या वतीने ‘त्रुटी’ असल्याचे प्रकार समोर आले आहेत. गुणवत्ता नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित अधिकारी मंजूर योजनांचे पालन केले जात आहे याची खात्री करण्यासाठी मासिक आधारावर प्रकल्पांची तपासणी करतील. ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या कामांच्या बाबतीत आणि ६० मीटरपेक्षा जास्त पुलाचा समावेश असलेल्या प्रकल्पांच्या बाबतीत अधिकाऱ्यांना द्विमासिक तपासणी करावी लागेल.

हेही वाचाः कलाकारांना मिळणार 5 ते 10 हजारपर्यंत साहाय्य

कर्तव्यात चुकल्यास होणार कारवाई

परिपत्रकात म्हटलं आहे की, अधिकारी त्यांचं कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांना साहित्य, मिश्रण आणि अंतिम उत्पादनांच्या महत्त्वाच्या गुणवत्तेच्या वैशिष्ट्यांची खात्री करून घेण्यासाठी प्रयोगशाळेत तसंच ऑन-साइट चाचण्या कराव्या लागतील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!