CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प वाढ

कोरोनाबळींचे आकडे 400 ने वाढले; तर 3 हजार 207 कोरोनाग्रस्तांना मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 5 हजारांनी वाढ झाली आहे. मंगळवारी 1 लाख 32 हजार 788 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी 3 हजार 207 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आणि कोरोनाबळींच्या संख्येत अल्प वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

हेही वाचाः कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात खासगी रुग्णालयांचे दर निश्चित

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 32 हजार 788 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 207 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 31 हजार 456 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 83 लाख 7 हजार 832 वर गेला आहे. देशात 2 कोटी 61 लाख 79 हजार 85 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 35 हजार 102 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 17 लाख 93 हजार 645 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

corona-1-1

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 21 कोटी 85 लाख 46 हजार 667 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!