CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट सुरुच

कोरोनाबळींची संख्याही घसरली; कोरोना बाधितांच्या संख्येत 6 हजारांनी घट

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 6 हजारांनी घट झाली आहे. शनिवारी 1 लाख 14 हजार 460 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 2 हजार 677 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट होत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. तसंच कोरोनातून बरं होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

corona-1-1

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 14 हजार 460 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 677 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 1 लाख 89 हजार 232 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 88 लाख 9 हजार 339 वर गेला आहे. देशात 2 कोटी 69 लाख 84 हजार 781 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 46 हजार 759 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 14 लाख 77 हजार 799 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

Corona Covid 19 India Tally

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 23 कोटी 13 लाख 22 हजार 417 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!