NEET PG 2021 Postponed | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर NEET PG परीक्षा अखेर रद्द

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: देशभरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरातील विविध परीक्षा रद्द केल्या जात आहे. नुकतंच राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा स्थगित

नीट पीजी 2021 ही परीक्षा येत्या 18 एप्रिलला आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय परीक्षा मंडळाने 14 एप्रिलला नीट पीजी परीक्षेचं हॉलतिकीट जारी केलं होतं. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. या परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पुढच्या तारखेची प्रतिक्षा आहे.

हेही वाचाः Board Exams | दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी #Goa​ #Marathi​ #News

सोशल मीडियावर परीक्षा रद्द करण्याची मागणी

दरम्यान ही परीक्षा पुढे ढकलावी यासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर #postponeneetpg अशी मोहिम सुरू केली होती. अनेक विद्यार्थ्यांसह संघटनेने ही परीक्षा रद्द करावी,  अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे उमेदवारांच्या गटाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला पत्र लिहिलं होतं. यात त्यांनी परीक्षा पुढे ढकलावी, असे यात नमूद करण्यात आलं होतं. या सर्वानंतर एनबीईने नीट पीजीच्या परीक्षेसाठी हॉलतिकीट जारी केलं होतं. ही परीक्षा रद्द करावी, यासाठी काही विद्यार्थी कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यताही वर्तवली जात होती.

हेही वाचाः Board EXAMS | सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द, तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

विद्यार्थ्यांना दिलासा

मात्र आता वाढत्या कोरोनामुळे ही परीक्षा रद्द केली होती. नीट पीजीच्या परीक्षेसाठी केवळ तीन दिवस शिल्लक असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेत 2 लाखाहून अधिक वैद्यकीय विद्यार्थी सहभागी होणार होते. आता ही परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!