एनसीबी मुंबईकडून 12 किलो गांजा जप्त

एकास अटक; पुण्यातील पाटस टोल नाक्याजवळ कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई महानगरात मादक पदार्थविरोधातील कारवाईचे सत्र सुरूच असून, रविवारी बदलापूर येथील एका वाहनातून 12 किलो गांजा जप्त केलाय. ही कारवाई पुण्यातील पाटस टोल नाक्याजवळ करण्यात आलीये. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे, असं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक आयआरएस समीर वानखेडेंनी सांगितलं.

हेही वाचाः सेसा वेदांता समूहाकडून कंपनीच्या आवारात वृक्षारोपण

1 लाख आणि 12kg गांजा जप्त   

याप्रकरणी सुनील भंडारी याला एनसीबी मुंबई पथकाने अटक करत ताब्यात घेतलं आहे. बदलापुरातून एके ठिकाणी नशिल्या पदार्थांची तस्करी केली जात असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पाळत ठेवून सुनील भंडारी त्याचा अंबरनाथ येथील साथीदार अमन गाडगे याच्यासह त्याच्या एमएच05ईए3340 क्रमांकाच्या कारमधून जात असताना पुण्यातील पाटस टोल नाक्याजवळ कार अडवली. कारची तपासणी केली असता त्यामध्ये 12 किलो गांजा मिळाला. यावेळी एकूण 1 लाख रुपये रोकडसह 12 किलो गांजा कारमधून जप्त करण्यात आला. गाडीच्या पुढच्या सीटच्या खाली हे अमली पदार्थ व्यवस्थितपणे लपवण्यात आले होते. एनसीबी मुंबईने सीआर 43/21 अंतर्गत या प्रकरणात कारवाई केली आहे.

हेही वाचाः डब्ल्यूआयआरसी- आयसीएसआयतर्फे रक्तदान शिबिर

एकास अटक

आरोपी सुनील भंडारीने यापूर्वी कल्याणच्या एनडीपीएस कोर्टमध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता, ज्याची सुनावणी 8 जून 2021 रोजी निश्चित केली आहे. एनडीपीएसच्या खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा इतर 9 प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग आहे आणि स्थानिक पोलिसांनी त्याला बदलापूरमध्ये शिक्षा दिली आहे. या प्रकरणात एकूण 40 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणाचं मूळ शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक आयआरएस समीर वानखेडेंनी सांगितलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!