देशभरातील हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवणारा गजाआड

एनसीबी मुंबईची कारवाई; दोघांना अटक; अटक केलेल्या व्यक्तींमध्ये एका नायजेरियनचा समावेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची (एनसीबी) टीम दररोज ड्रग्सशी संबंधित नवीन प्रकरणं समोर आणत आहे. काल रात्री एनसीबीला माहिती मिळाली की मुंबईतील एक श्रीमंत व्यक्ती एका नायजेरियनकडून कोकेन विकत घेऊन देशातील विविध भागात असलेल्या आपल्या ग्राहकांना पुरवतो. त्यानंतर एनसीबीने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर काल रात्री एनसीबीला मीरा रोड परिसरात ती व्यक्ती आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एनसीबीने सापळा रचून त्या व्यक्तीला पकडलं. 

हेही वाचाः अभिनेता सलमान खानसह बहिणीविरोधात पोलिसात तक्रार

समीन वानखेडे म्हणाले,

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले, आम्ही ज्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय तिच्याकडून कोकेन ताब्यात घेतलीये. जेव्हा आम्ही त्याला पकडलं, तेव्हा तो मध्य प्रदेशात कुठेतरी ड्रग्स पुरविण्याच्या मार्गावर होता. 

हेही वाचाः मोठी कारवाई! GST चोरीप्रकरणी गोव्यात पहिल्यांदाच दोघांना अटक

अटक करण्यात आलेल्या ड्रग पेडलरचं नाव सुफ्रान फारूख लकडवाला (Suffran Farooq Lakdawala) आहे, जो मुंबईच्या लोखंडवाला रोडवरील हाय प्रोफाइल सोसायटीमध्ये राहतो. एनसीबीला त्याच्या मोबाईलमधून ड्रग्सच्या ग्राहकांशी संबंधित बरीच माहिती मिळाली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे फोटोजही त्यांच्या फोनमध्ये सापडले आहेत. 

रिक्षा चालक बनून पकडलं नायजेरियनला

अटक केल्यानंतर सुफ्रानने एनसीबीला त्या व्यक्तीबद्दल सांगितलं जी त्याला ड्रग्ज पुरवते. यानंतर, ड्रग्स सप्लायर ब्लेसिंग एडविन ओकेरेके (Blessing Edwin Okereke) या नायजेरियनला पकडण्यासाठी एनसीबीने वाहन चालकाचा वेष धारण केला आणि नालासोपारा भागात सापळा रचला आणि त्यानंतरच नायजेरियन तिथे दुचाकीवर बसून आला. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याने एनसीबीशी दोन हात करण्यास सुरुवात केली आणि दरम्यान तिथे बरेच लोक जमले, ज्यांनी त्या नायजेरियनची बरीच धुलाई केली. 

स्थानिक पोलिसांच्या मदतीने नायजेरियनला वाचवलं

यानंतर एनसीबीला स्थानिक पोलिसांना बोलवावं लागलं आणि त्यानंतर त्यांच्या मदतीने नायजेरियनला वाचवण्यात आलं. झडती घेत असताना एनसीबीने त्याच्याकडून मेफेड्रोन आणि कोकेन (Mephedrone and Cocaine) ड्रग्स जप्त केले. एनसीबीने आता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याशी संबंधित लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे आणि तो कुठल्या श्रीमंतांच्या पार्टीत रंग भरण्याचं काम करण्यासाठी ड्रग्स पुरवतो याचा शोध एनसीबी घेत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!