‘नो शर्ट फ्री बिअर’ ऑफर महिलांना देणारा बार भाजप कार्यकर्त्यांनी शोधला!

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : लॉकडाऊननंतर सगळ्यात आधी जर कोणती सगळ्यात आधी सुरु झाली असेल, तर ती म्हणजे दारुची दुकानं. याच दारुच्या दुकानांबाहेर लागलेल्या रांगाही तुम्ही न्यूज चॅनेलवर पाहिल्या असतील. तळीरामांनी दुकानं उघण्याआधीच कशी शिस्तीत रांग लावली होती, हे आपण सगळ्यांनी पाहिलं. पण गोव्याच्या शेजारी महाराष्ट्रात एका बारनं तर हद्दच केली. महिलांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी आणलेले ऑफर फारच चर्चेत आली आहे.
नो शर्ट, फ्री बिअर
नो शर्ट फ्री बिअरची ऑफर देणारा बिअरबार जरा चांगलाच चर्चेत आलाय. हा बार आहे महाराष्ट्रातल्या नवी मुंबईतमध्ये. नवी मुंबईच्या पाल्म बीच परिसरात असणारा हा बार सध्या तुफान चर्चेत आलाय. पाल्म पीच गॅलेरीया मॉलमधील एजेन्ट जॅक्स बारने ही अजब ऑफर दिलीये.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लोकं कुठल्या थराला जातील याचा काहीही नेम नाही. या बारच्या बाबतीतही तेच घडलंय. पुरुषांसाठी नो शर्ट नो सर्विस तर महिलांसाठी नो शर्ट फ्री बिअरची ऑफर देणाऱ्या या बारच्या जाहिरात सध्या चर्चिल्या जात आहेत. इतकंच नाही, तर अल्कोहोल किल्स कोरोना, असाही दावा करणारी जाहिरात या बारने झळकावलीये.
भाजपवाल्यांना कसा सापडला बार?
भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी हा बार शोधून काढला आणि या प्रकारावर सवाल उपस्थित केलेत. आता या बारवर काय कारवाई होते, ते पाहणं महत्त्वाचंय. तोवर संपूर्ण राज्यात या बारची चर्चा रंगलीये.
हेही वाचा –
हीच खरी पॉझिटिव्ह बातमी! अहो, पगारवाढ मिळतेय, आपली कधी?
अजबच! ती चक्क दातांनी सोलते नारळ…