पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार शेतकऱ्यांशी संवाद

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांना देणार हप्ता

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शुक्रवारी, 25 रोजी दुपारी 12 वाजता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेखाली शेतकऱ्यांना पुढचा हप्ता देणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हा कार्यक्रम होईल.

दरम्यान, भाजपचे सर्व खासदार, आमदार, पक्षाच्या इतर नेत्यांनी या कार्यक्रमाला गट पातळीवर हजर रहावे, असे आवाहन भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी केले आहे. किसान योजनेखाली 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18 हजार कोटी रुपये जमा केले जाणार आहेत.

पेडणे येथील पेडणे तालुका सहकारी सोसायटीमधील कार्यक्रमास मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) उपस्थित राहणार आहेत. पिर्ण येथील कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे आणि थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर, डिचोली येथील कार्यक्रमास विधानसभा सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar), पाळी-साखळी येथील कार्यक्रमास केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik), धारबांदोडा-कुळे येथील कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर (Deepak Pauskar), केपे येथील कार्यक्रमास उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री बाबू कवळेकर (Babu Kavalekar), सांगे येथील कार्यक्रमास आमदार सुभाष शिरोडकर, भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव गावकर, माजी आमदार सुभाष फळदेसाई, तर काणकोण येथील कार्यक्रमास विधानसभेचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस उपस्थित राहणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!