महंत नरेंद्र गिरी यांनी केली आत्महत्या

7 पानी सुसाइट नोटमधून धक्कादायक कारण आलं समोर

Goan Varta Live | प्रतिनिधी

हरिद्वार: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर खोलीचा तपास केला असता एक सुसाइड नोट सापडली आहे. या नोटमध्ये त्यांनी एका शिष्याचा उल्लेख केला आहे. या शिष्यामुळे महंत तणावात होते. पोलिसांनी आता महंत यांचे शिष्य आनंद गिरी यांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह बाघंबरी मठातील त्यांच्या खोलीत आढळला होता. त्यांनी नायलॉनच्या रश्शीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर ही आत्महत्या असल्याचं सांगितलं आहे.

पोलिसांनी जारी केलं वक्तव्य…

प्रयागराज पोलिसांनी महंतांच्या मृत्यूबाबत एक नोट जारी केली आहे. यानुसार, घटनास्थळाहून 6 ते 7 पानी सुसाइड नोट सापडली आहे. यामध्ये महंत नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरी आणि अन्य शिष्यांची नावं लिहिली आहेत. अनेक कारणांमुळे ते त्रस्त होते, असं या सुसाइड नोटमुळे समोर आहे. त्यामुळे ते आत्महत्या करीत असल्याचं लिहिलं होतं. यावेळी महंतांनी त्यांची संपती, आश्रम कोणाला दिला जावा, किंवा कोण याची काळजी घेईल याबद्दल देखील लिहिलं आहे. शिष्यांमुळे दुखी असल्या कारणाने आत्महत्या करीत असल्याचं त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महंत नरेंद्र गिरी यांची खोली आतून बंद होती. ज्यानंतर संशय निर्माण झाला आणि त्यांची खोली उघडण्यात आली. खोलीमध्ये महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह खांब्याला लटकलेल्या अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सांगितलं जात आहे की, महंत नरेंद्र गिरी गेल्या अनेक दिवसांपासून काही शिष्यांमुळे तणावात होते.

आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर अयोध्येत शोककळा पसरली आहे. हनुमानगडीतील राजू दास यांनी सांगितलं की, आखाडा परिषदेच्या अध्यक्षांच्या निधनाचं वृत्त खूप दु:खदायक आहे. सनातन धर्माच्या रक्षेसाठी ते सदैव तत्पर होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!