मुंबईतल्या पठ्ठ्याकडून बॅटरीवर चालणाऱ्या सायकलची निर्मिती

इंधन दरवाढीमुळे नागरिक हैराण

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: सध्या पेट्रोलच्या किंमतीने शतक पार केलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. ही परिस्थिती पाहता मुंबईतील एका युवकाने बॅटरीवर चालणारी सायकल बनवली आहे. अशी सायकल बाजारात आली तर यामुळे सामान्य माणसाला नक्कीच फायदा होईल, असं म्हटलं जात आहे.

हेही वाचाः कर्नाटकात पुन्हा राजकीय नाटकं! मुख्यमंत्री बदलले जाण्याच्या चर्चांना उधाण

बॅटरीवर चालणारी सायकल

बॅटरीवर चालणाऱ्या सायकलींचा मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद देशातील अन्य मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. प्रामुख्याने डिलिव्हरीसाठी अशा प्रकारच्या सायकलचा उपयोग केला जातो. या सायकलींवर 20 पैसे प्रतिकिलोमीटर इतका खर्च होतो. त्यामुळे बाईक आणि स्कूटरच्या तुलनेत या सायकल बेस्ट ठरतात.

हेही वाचाः दिलासादायक! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येत घट

लिथियम बॅटरीचा उपयोग

या सायकलमध्ये लिथियम बॅटरीचा उपयोग केला जातो, तसंच ही बॅटरी आपण आपल्या घरातच चार्ज करू शकतो. संपूर्ण बॅटरी चार्ज होण्यासाठी तीन ते चार तासांचा अवधी लागतो. त्यामध्ये ही 80 टक्के चार्ज होऊ शकते. ही बॅटरी आणि सायकल बनवणाऱ्या विकास गुप्ता यांनी सांगितलं की, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही सायकल 20 ते 40 किलोमीटर इतक्या लांबचा पल्ला गाठू शकते.

हेही वाचाः भारतीय तटरक्षक दलाने गोवा किनाऱ्यावर पुरवली तातडीची वैद्यकीय मदत

22 हजार रुपये खर्च

ही सायकल मुंबईतील व्हीजेटीआय कॉलेजच्या एका विद्यार्थ्याने बनवली असून ही सायकल बनवण्यास जवळपास 22 हजार रुपये इतका खर्च आला आहे. त्यासोबतच हीच सायकल बाजारात उपलब्ध झाली तर त्याची किंमत 27 हजार रुपयांपर्यंत असू शकते. विविध स्तरांवर या सायकलची टेस्टिंग सुरू आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!