मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाहतूक बंद?

सोशल मीडियावर जुना व्हिडिओ व्हायरल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक बंद केली असल्याचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा आहे. मात्र या व्हिडिओची सत्यता पडताळली असता वेगळंच सत्य समोर येतंय.

हेही वाचाः अरे देवा! गोव्याचा पॉझिटिव्हिटी रेट देशापेक्षाही जास्त

काय आहे व्हिडिओ?

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक बंद केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिसांनी गाड्या अडवल्या असल्याचं दिसतंय. गाड्यांना पोलिस पुढे सोडत नाहीयेत. तर काही जणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. व्हायरल व्हिडिओमुळे सध्या विविध चर्चांनाही उधाण आलंय.

हेही वाचाः Sonu Sood Tweet | जे सरकार विद्यार्थ्यांचं ऐकत नाही, ते सोनू सूदचं ऐकणार?

एक वर्षं जुना व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ एक वर्षं जुना असल्याची माहिती समोर आलीये. खरंतर  गेल्यावर्षीच्या लॉकडाऊन काळातील हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामुळे काही वेळासाठी वाहतूक प्रशासनासोबत पोलिस यंत्रणेचाही गोंधळ उडाला. मात्र तपासाअंती हा व्हिडिओ एक वर्षं जुना असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान हा व्हिडिओ मात्र बराच व्हायरल झाला.

हेही वाचाः गोवा बोर्डाच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वाहतूकीसाठी खुला

मुंबईतील वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ जुना आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वाहतूकीसाठी खुला आहे. मात्र काही ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. जे लोक विनाकारण फिरतायत त्यांना थांबवून पोलिस त्यांची चौकशी करतायत, त्यांच्यावर कारवाई केली जातेय, तर ज्यांना अत्यावश्यक सेवेंतर्गत प्रवासाची मुभा आहे त्यांना या एक्स्प्रेस वेवर प्रवास करू दिला जातोय. अत्यावश्यक सेवेसाठी हा एक्स्प्रेस वे पूर्ण खुला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!