धारावीची करोनामुक्तीकडे वाटचाल

आज पुन्हा शून्य रुग्णाची नोंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबईः करोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील रुग्णसंख्या अटोक्यात येत आहे. धारावीत आज शून्य करोना रुग्णांची नोंद झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्येतही घट झाली आहे. एएनआय वृत्त संस्थेने याविषयी ट्विट करून माहिती दिली आहे.

हेही वाचाः पेडणेचा स्वाभिमान ‘उत्तम कोटकर’

कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्या प्रमाणात आढळले होते रुग्ण

गेल्यावर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत धारावीत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. दररोजची रुग्णसंख्या अंदाजे ४००हून अधिक नोंदवली जात होती. यावेळी पालिकेने ‘मिशन झिरो’, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ यासह विविध प्रकारच्या उपाययोजना राबवल्या. परिणामी यंदाच्या जानेवारीपर्यंत धारावी कोरोनामुक्त झाली. करोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीत संसर्ग पुन्हा वाढू लागला होता. मात्र आधीच्या अनुभवावरून पालिकेने उपाययोजना आणखी बळकट करत संसर्ग नियंत्रणात आणला.

काही दिवसांपासून 1 ते 2 रुग्णांची नोंद

गेल्या महिन्याभरापासून धारावीत एक ते वीसपर्यंत नवीन रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून एक ते दोन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील करोना साथीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आज धारावीत एकही करोनाचा रुग्ण सापडला नाहीये. धारावी विभागात आतापर्यंत करोनाबाधित ६८६१ रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचाः EXCLUSIVE VIDEO : ‘तळीरामां’नी केली चक्क दारूच्या बाटलीची पुजा !

दादर, माहीममधील कोरोना संसर्ग नियंत्रणात

धारावीपाठोपाठ दादर आणि माहीममधील करोनाचा संसर्ग नियंत्रणात येतो आहे. दादर भागात आतापर्यंत ९ हजार ५५७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज फक्त ३ रुग्ण सापडले आहेत. तर, माहिममध्ये आज दिवसभरात सहा रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचाः काँग्रेसकडून नवीन मीडिया विभागाची नियुक्ती

मुंबई रुग्णवाढीचा दर ०.१० टक्के

दरम्यान, मुंबईत करोना संसर्गाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या सध्या ७००च्या आसपास असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.१० टक्के इतका खाली आला आहे तर रुग्णदुपटीचा कालावधी वाढून तब्बल ६५३ दिवसांवर पोहचला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!