बोरिवलीत रहिवासी इमारतीला भीषण आग

अग्निशमन दलाचा १ अधिकारी गंभीर जखमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: मुंबईच्या बोरिवली येथील इमारतीत भीषण आग लागली आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावर ही आग लागली असल्याची माहिती आहे. या अपघातात अग्निशमन दलाचा एक अधिकारी गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही आग मोठी असून संपूर्ण परिसरात आगीचे लोळ पसरल्याची माहिती आहे.

हेही वाचाः RAIN UPDATE | सतर्क रहा! पावसाचा जोर वाढणार

मिळालेल्या माहितीनुसार, आग इतकी भीषण आहे की, संपूर्ण परिसर धुराच्या लोटाने काळा झाला आहे. सध्या, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. अरुंद रस्ता असल्याने अग्निशमन दलाला आग विझवणे कठीण जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. तर अधिकाऱ्यांनी आसपासच्या इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बोरिवली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन सोसायटीच्या सातव्या मजल्यावर ही आग लागली आहे. आगीमुळे सोसायटी कॅम्पसमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांची सुटका करण्यात आली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण स्वयंपाकघरात गॅस गळतीमुळे ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचाः सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणः गोमेकॉकडून तीन सदस्यीय वैद्यकीय मंडळाची स्थापना

सर्व नागरिकांची व्यवस्थित केली सुटका

आगीनंतर फ्लॅटमधील रहिवाशांची योग्य प्रकारे सुटका करण्यात आली आहे. गर्दीच्या क्षेत्रामुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहचण्यात काही अडचण येत आहे, पण तरीदेखील नागरिकांना वाचवण्यात आलं आहे. एका फायरमनला किरकोळ जखमांव्यतिरिक्त, आगीत आतापर्यंत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही.

हा व्हिडिओ पहाः DOG ATTACK | कुत्र्यांकडून 20 पेक्षा अधिक चावे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!