पंतप्रधान मोदींच्या भावाचं विमानतळावरच आंदोलन

प्रल्हाद मोदींनी का केलं आंदोलन?

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील वातावरण शेतकरी आंदोलनानं ढवळून निघालंय. कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचं आंदोलन सगळ्या जगाचं लक्ष वेधू लागलंय. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावानं आंदोलन केलंय. ठिकाण होतं लखनऊ विमानतळ. फक्त आंदोलनच नाही तर उपोषणाला बसू असा इशाराही आंदोलन केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावानं केलाय. सध्या या आंदोलनाची एकूणच चर्चा रंगली आहे.

आंदोलनाचं कारण काय?

उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये विमानतळावरच मोदींचे बंधू आंदोलनाला बसलेत. प्रल्हाद मोदी असं त्यांचं नावंय. त्यांच्या काही समर्थकांना ताब्यात घेतल्याने प्रल्हाद मोदी नाराज झाल्याचं बोललं जातंय. म्हणूनच त्यांनी थेट विमानतळाबाहेरच ठिय्या मांडला. लखनऊ पोलिसांच्या कार्यपद्धतीविरोधात प्रल्हाद मोदी यांनी आंदोलन केलंय. सोबतच आपल्या समर्थकांची सुटका केली नाही तर उपोषण करू असा इशाराही प्रल्हाद मोदी यांनी दिला आहे.

प्रल्हाद मोदींच्या स्वागतासाठी आलेल्या १०० कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतल्यानं हा सगळा प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय. चार फेब्रुवारीला सुल्तानपूर आणि पाच फेब्रुवारीला जौनपूर तर सहा फेब्रुवारीला प्रतापगड इथं प्रल्हाद मोदींचा कार्यक्रम होता. यासाठी लखनऊ विमानतळावर ते दाखल झाले. तिथे पोहोचल्यावर त्यांच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतलं, असा आरोप प्रल्हाद मोदी यांनी केलाय. म्हणूनच आंदोलन केल्याचा खुलासा मोदी यांनी केलाय. जोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना सोडलं जात नाही तोपर्यंत असंच विमानतळावर आंदोलन करत राहू, असं असा इशाराही नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी दिला आहे.

हेही वाचा – पर्यटनाला उभारी देण्यासाठी केंद्राकडून गोव्याला विशेष पॅकेज?

उत्पल पर्रीकर, रमेश तवडकरांची राष्ट्रीय पातळीवर दखल

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!