सभागृहात बसून पॉर्न कंटेट स्क्रोल करताना राजकीय नेता कॅमेऱ्यात कैद

वाचा नेमकं कुठे काय घडलं?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : पुन्हा एकदा पॉर्न पाहत असताना राजकीय नेते कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यावेळची घटना आहे गोव्याला खेटूनच असणाऱ्या कर्नाटकातली. कॉंग्रेसचे आमदार प्रकाश राठोड यांच्यावर अश्लील व्हिडीओ सभागृहामध्ये पाहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. . विरोधकांनी असा आरोप केला आहे की बसून राठोड सभागृहामध्ये बसूनच चक्क त्यांच्या मोबाइलवर काही अश्लील क्लिप पहात होते. इतकंच नाही, तर व्हिडीओ पाहतानाची त्यांची दृश्यंही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्याबाबतच व्हिडिओही समोर आलाय. त्यामुळे सभागृहाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे

खरं तर प्रकाश राठोड यांच्याविषयी बोलल्या जाणाऱ्या व्हिडिओमध्ये ते आपला मोबाईल स्क्रोल करताना दिसत आहेत. दरम्यान, फोनवरील इतर क्लिपमध्ये काही अश्लील सामग्रीसुद्धा त्यांच्या फोनमध्ये दिसतेय. मात्र राठोड त्यावर क्लिक करत नाहीत आणि पुढे स्क्रोल करतात. एका स्थानिक वाहिनीवर हा व्हिडिओ दाखवण्यात आला आणि त्यानंतर एकच गोंधळ उडालाय.

या संदर्भात राठोड म्हणाले –

“माझ्या फोनची मेमरी फुल झाली होती. मला एक फाईल डाऊनलोड करायची होती. पण फोनमध्ये जागेअभावी मी फाईल डाउनलोड करू शकलो नाही. म्हणून फोनवरून काही गोष्टी हटवत होतो”

राठोड यांनी लोकांना सत्य दर्शवावे असे आवाहन केले आहे आणि ते म्हणाले की ते हा फोन विधान परिषदेशी संबंधित कामांसाठी वापरत आहेत. मात्र भाजप नेत्यांनी यासगळ्यावर आक्रमण होत राठोड यांना राजीनामा देण्याची मागणी केली आहे. सभागृहाचा सन्मान नष्ट करण्याचे काम राठोड यांनी केल्याचं भाजपचे प्रवक्ते एस. प्रकाश यांनी म्हटलंय. प्रकाश यांनी राठोड यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

2012मध्ये घडलेला किस्सा

२०१२ मध्ये कर्नाटकचे भाजप नेते लक्ष्मण सावडी हेदेखील विधानसभेत पॉर्न पाहताना आढळले होते. इतर दोन नेतेही त्यांच्याबरोबर अश्लील व्हिडीओ पहात होते. सावेडी यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की शिक्षणाच्या उद्देशाने ते अश्लील पहात होते, जेणेकरुन रेव्हपार्टीबाबत माहिती मिळेल. मात्र त्यानंतर सावडी, सीसी पाटील आणि कृष्णा पालेमार यांना कर्नाटकात मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. नंतर 2019 मध्ये सावडी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री बनले होते.

हा Video पाहिल्यानंतर तुम्ही पिझ्झा खाणं सोडून द्याल!

ग्रीन टी पित असाल तर हे वाचाच..

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!