मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाडचं निधन

अवघ्या 34 वर्षी घेतला अखेरचा श्वास; कोरोनामुळे झाला मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: तुम्ही जर स्वत:ला फिट समजत असाल तर थोडं थांबा, कोरोनाला हलक्यात घेऊ नका, कारण तुम्ही म्हणत असाल की मी फिट आहे माझी चांगली बॉडी आहे तर असं नाही. बॉडीबिल्डिंगमधले सर्व सर्वोच्च किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं निधन झालं. जगदीश अवघ्या 34 वर्षाचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला. जगदीशच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. 

हेही वाचाः धक्कादायक! लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन

कोरोनामुळे निधन

नवी मुंबईत राहणाऱ्या जगदीशने गेल्या वर्षी बडोद्यात व्यायमशाळा सुरू केली होती. त्यानिमित्ताने तो बडोद्यात असायचा. गेल्या काही दिवसांपूर्वी जगदीशला कोरोनाची लागण झाली होती. अखेर त्याचं निधन झालं.

हेही वाचाः पंडित योगराज नाईक यांचे निधन

मुंबई महापौर श्रीच्या किताबाचा मानकरी

स्पर्धेसाठी जगदीश उभा राहिली की पदक निश्चित असायचं. कारण त्याचं पिळदार शरीर हे सर्वांना आकर्षित करायचं. त्यासाठी जगदीश अपार मेहनतही करायचा रोज सकाळी उठून दोन तास व्यायम, प्रोटीन्ससाठी चांगला डाएट, चिकन, अंडी, मटण रोजच्या रोज जगदीशच्या आहारात असायचा.  जगदीश लाडने कमी वयात बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. त्याने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास चार वेळा सुवर्णपदकाची कमाई केली होती. एवढंच नव्हे तर मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. तसंच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवलं होतं.

बॉडीबिल्डिंग विश्वाचं मोठं नुकसान

त्याच्या निधनावर महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने दुःख व्यक्त केलं आहे. एक नावाजलेला चेहरा गेल्याने बॉडीबिल्डिंग विश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. पण त्याचबरोबर आपण फिट असल्याचा तोरा मिरवणाऱ्या लोकांनाही सावध करुन गेला आहे. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!