डंपरचे ब्रेक फेल झाले अन्….

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट: सिंधुदुर्ग-महाराष्ट्रातील वेंगुर्ला तालुक्यातील रेडी – हुडा येथे मायनिंगने भरलेला डंपर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात गाडीचं नुकसान झालं असून त्या दरम्यान वाहतूक कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
हेही वाचाः खाण बंदीस तीन वर्षं पूर्ण
चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला
कळणे येथून खनिज भरून चालक (एम एच ०७ सी ६०८७) हा डंपर घेऊन रेडी येथे येत होता. मात्र दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हुडा येथे डंपर आला असता वळणावर तो पलटी झाला. ब्रेकफेल झाल्याने चालकाचा गाडीवरचा ताबा सुटून डंपर पलटी होऊन अपघातात झाल्याचं बोललं जातंय. मात्र सुदैवाने डंपर चालक या अपघातातून बचावला.
हेही वाचाः वागातोर रेव्ह पार्टी : पर्यटन खाते रडारवर
मळेवाड येथेही मायनिंग डंपर पलटी
दरम्यान काल रात्री मळेवाड येथे असाच एक मायनिंगचा डंपर पलटी होऊन अपघात झाला. 1 महिन्यापूर्वी आजगाव येथे घडलेला डंपरचा भीषण अपघात व हे दोन अपघात लक्षात घेता चालक डंपर मालक आणि मायनिंग व्यवस्थापक यांनी एकत्रितरीत्या बैठक घेऊन यावर योग्य तोडगा काढावा. लोकांच्या जीविताशी खेळू नये अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा शिरोडाचे रहिवासी आणि शिवसेनेचे पदाधिकारी आदेश परब यांनी दिलाय.
हेही वाचाः राज्य निवडणूक आयुक्तपदी नावती