नया है यह! खाताना मास्क नाही काढायचा फक्त चैन उघडायची

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : करोनामुळे मास्क घालणं सगळ्यांना बंधनकारक आहे. ही बातमी लिहितानाही आम्हाला मास्क घालावाच लागतो. गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेलं सगळं हळूहळू सुरु होत आहे. हॉटेल्सही त्याला अपवाद नाहीत. अटी शर्थींसह हॉटेल्सही सुरु झालेत. हॉटेलमध्ये जर लोक येणार असतील तर किमान खाताना तरी त्यांना मास्क काढावा लागणारच. पण यावरही एका हॉटेल चालकानं भारी कल्पना शोधून काढली आहे.
घास खातानाही मास्क हवाच!
पश्चिम बंगालमध्ये एक हॉटेल आहे. या हॉटेलात येणाऱ्यांना खातानाही मास्क काढण्याची गरज नाही. या हॉटेलात येणाऱ्यांना मास्क पुरवले जात आहेत. या मास्कला चैन आहे. तोंडाजवळच असणाऱ्या या चैनचा उपयोग केला, तर खातानाही हा मास्क काढावा लागत नाही. ओठांजवळच चैन असल्यानं फक्त खाण्यापुरत्या वेळेत चैन उघडायची. खास तोंडात टाकायचे आणि मास्क बंद करायचा. महत्त्वाचं म्हणजे अतिरिक्त पैसे न घेता हा मास्क हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना पुरवला जातोय.
महामारीतही क्रिएटिव्हिटीला बहर
करोना काळात कुणी सोन्याचे मास्क बनवले तर कुणी आणखी कसेल कसेल मास्क तयार केले. या महामारीतही लोकांच्या क्रिएटिव्हिटीला असलेला बहर तसूभरही कमी झालेला नाही. पश्चिम बंगालच्या कोलकात्यात असलेलं हे हॉटेल्स सध्या चैन असलेल्या मास्कमुळे चर्चेत आलंय. कोलकात्यातील हा प्रयोग यशस्वी झाला, तर भविष्य देशातली इतरही भागात असे चैन असलेले मास्क हॉटेलात बंधनकारक झाले, तर नवल वाटायला नको. खाताना मास्क घालणं, कटकटीचं तर होत नाही, हे आता हा मास्क घालून खालेल्यांनाच माहीत. पण तूर्तासतरी संसर्ग टाळण्यासाठी कोलकात्यातील हॉटेलने तयार केलेले ही अनोखे चैनवाले मास्क भाव खाऊन जाणार, हे नक्की.
West Bengal: A restaurant in Kolkata is providing its customers with masks that have zips attached to them.
— ANI (@ANI) October 18, 2020
Owner of the restaurant says, “We’re providing it to customers without any extra charges. However, it is not mandatory, they can wear it if they want to.” #COVID19 pic.twitter.com/FQnhpak2fx