जुलैपासून ‘या’ कंपनीच्या सर्व गाड्या महागणार

त्याआधीच बंपर डिस्काऊंटसह वाहन खरेदीची संधी

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: भारतातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी जुलै महिन्यापासून आपल्या वाहनांच्या किंमती वाढवणार आहे. कंपनीने रेग्यूलेटरी फायलिंगमध्ये म्हटलं आहे की, वाहनांच्या किंमतीत वाढ करणं अनिवार्य झालं आहे. पुढील महिन्यापासून कंपनी आपल्या वाहनांच्या नवीन किंमती जाहीर करणार आहे.

हेही वाचाः PHOTO STORY | विठोबाला सोवळं, तर रखुमाईला नऊवारी

रेग्यूलेटरी फायलिंगमध्ये दिली माहिती

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आपल्या रेग्यूलेटरी फायलिंगमध्ये म्हटलं आहे की, गेल्या काही वर्षांपासून इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीच्या वाहनांच्या किंमतींवर सातत्याने परिणाम होत असल्याचं सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे या वाहनांच्या किंमती वाढवून थोडासा भार ग्राहकांवर टाकणं अनिवार्य झालं आहे. यासह, कंपनीने पुढे म्हटलं आहे की, या किंमती वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार बदलतील.

हेही वाचाः जगाला मिळणार योगाचे धडे

याआधीही किंमतीत वाढ

यापूर्वी इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे कंपनीने एप्रिलमध्ये आपल्या मोटारींची किंमत वाढविली होती. जानेवारीमध्येही मारुती सुझुकीने इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे काही मोटारींच्या किंमती वाढवल्या होत्या. कारच्या वेगवेगळ्या मॉडेल्स आणि रेंजनुसार कंपनीने 34 हजार रुपयांची वाढ केली आहे.

हेही वाचाः JOB ALERT | बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी बंपर भरती

उत्पादन पुन्हा रुळावर

कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे, देशभरातील परिस्थिती नियंत्रणात येत आहे. त्यामुळे कंपन्यांनी पुन्हा एकदा उत्पादनाला जोमात सुरुवात केली आहे. तसंच विक्री आणि वाहनांची डिलीव्हरीदेखील सुरु झाली आहे. लॉकडाउन आणि कर्फ्यूमुळे सर्व ऑटोमेकर्सनी त्यांचे उत्पादन थांबवले होतं, पण आता परिस्थिती रुळावर आली आहे. मारुती सुझुकीच्या प्रवक्त्याने सांगितले की, सुरक्षा नियमांचे पालन करून कंपनीच्या प्लांटमध्ये उत्पादन सुरू झालं आहे.

हेही वाचाः दगामा यांची टोकियो ऑलिम्पिक्ससाठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड

या महिन्यात बंपर डिस्काऊंट

मारुती सुझुकी या महिन्यात आपल्या मोटारींवर बंपर सवलत देत आहे. कंपनीच्या नेक्सा डीलरशिपच्या गाड्यांवर ग्राहकांना 41 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यात Baleno, Ignis, XL6, S-Cross आणि Ciaz सारख्या मोटारींवर सूट देण्यात येत आहे. ही सवलत मर्यादित काळासाठी आहे आणि ही ऑफर वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि डीलरशिपमध्ये वेगवेगळी असू शकते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!