BLAST | हेडफोन्सचा स्फोट होऊन तरुणाचा मृत्यू

चार्ज करताना ब्लूटूथ हेडफोनमध्ये स्फोट

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: हेडफोन किंवा इअरफोन वापरणाऱ्यांसाठी सावधान करणारी बातमी आहे. तुम्ही कॉल करण्यासाठी किंवा म्युझिक ऐकण्यासाठी हेडफोन किंवा ब्लूटूथ इयरफोन वापरत असाल तर तुम्हालाही सतर्क राहण्याची गरज आहे.

हेही वाचाः एकही जण कसाकाय पॉझिटिव्ह आढळत नाही?

चार्ज करताना ब्लूटूथ हेडफोनमध्ये स्फोट

चार्ज करताना ब्लूटूथ हेडफोनमध्ये स्फोट झाल्यानं नुकताचा एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी शनिवारी सांगितले की, अपघातात बळी पडलेला 28 वर्षीय तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर तरुणाला रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचाः पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणं म्हणजे वैवाहिक बलात्कार

हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू

हा तरुण ब्लूटूथ हेडफोन्स कानाला लावून घरात बसला होता, मात्र त्याचवेळी हेडफोन चार्जिंग प्लगशी जोडले होते. अचानक हेडफोनमध्ये स्फोट झाला आणि तरुण बेशुद्ध झाला. अपघातानंतर तरुणाला तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृतदेह युवकाच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.

हेही वाचाः साखळी नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव फेटाळला

राजस्थानाच्या जयपूरमधील घटना

ही घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये चौमु शहरातील उदयपुरिया गावात घडली आहे. मृत युवकाचं नाव राकेश कुमार नागर आहे. राकेश कुमारचं लग्न यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालं होतं. घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की राकेश अभ्यासात हुशार होता आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.

हेही वाचाः जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोस लसीला भारतात मंजूरी

चार्जिंग दरम्यान मोबाईल वापरल्याने स्फोट होण्याची भीती

मोबाईल, मोबाईल एक्सेसरीज किंवा इलेक्ट्रिक उपकरणे यांचा आपल्याला फार उपयोग होतो. मात्र या वस्तू वापरण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, काही नियम आहेत. मात्र अनेकता आपण या वस्तू चुकीच्या पद्धतीने हाताळतो, त्यामुळे असे अपघात घडतात. चार्जिंग दरम्यान मोबाईल वापरल्याने स्फोट झाल्याच्याही अनेक घटना समोर आल्या हेत. त्यामुळे काही गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत जेणेकरुन असे अपघात होणार नाहीत. 

हा व्हिडिओ पहाः Video | FREE AMBULANCE | कुडचडे काँग्रेसचे नेते अमित पाटकर संतप्त

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!