पुन्हा काळाचा घाला! बस उलटली, तिघांचा मृत्यू

कोरोनामुळे अनेकांनी पुन्हा धरली घरची वाट

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : पहिल्या लॉकडाऊनमध्ये झालेले मजुरांचे सगळ्यांना माहीत आहेतच पण त्यांची परवड अजूनही थांबलेली नाही. दिल्लीत लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अनेक मजुरांनी घरची वाट धरली आहे. अनेक राज्यांमध्ये निर्बंध लावले जात आहेत, त्यामुळे हातावर पोट असणारे अनेक मजूर पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी निघालेत. अशात गावी जाण्यासाठी निघालेल्यांवर पुन्हा एकदा काळानं घाला घातला आहे.

हेही वाचा – Lockdown? | संपूर्ण देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतं का? या आहेत 5 शक्यता

काय आहे घटना?

घटना आहे मध्य प्रदेशातली. बस उटलली आणि या तिघांचा मृत्यू झाला आहे. ग्वालियर जिल्ह्यातील जोरामीमध्ये भीषण अपघात घडला. दिल्लीहून छात्रपूर आणि टिकमगडला निघालेल्या बसचा वाटेत भीषण अपघात झाला. हायवेवरच ही बस उलटली. या बसमध्ये असलेल्या तिघांचा मृत्यू झालाय.

हेही वाचा – हृदयद्रावक! अपघातात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त! आईसह 3 मुलींचा दुर्दैवी अंत

या अपघातानंतर तात्काळ पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झालंय. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या भीतीनं सगळेच धास्तावले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. मंगळवारी सकाळी दिल्लीतील बस स्थानकावर मोठी गर्दी उसळली होती. आपल्या घरी जाण्यासाठी अनेकजण बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात आल्याचे फोटोही समोर आले आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडालाय. महत्त्वाची बाब म्हणजे दिल्लीत एका आठवड्याचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन रुग्णसंख्या आटोक्यात आला नाही, तर वाढूही शकतो, असा अंदाज वर्तवला जातो आहे. देशाच्या राजधानी कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आलाय. या सगळ्यात अपघाताच्या वृत्तानं आपलं गाव गाठवण्यासाठी घराबाहेर पडल्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!