मुंबई-सिंधुदुर्ग विमान सेवेला जोरदार प्रतिसाद

20 ऑक्टोबर 2021पर्यंतचे आरक्षण फुल्ल

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: मुंबई-सिंधुदुर्ग विमान सेवेला उद्याप सुरुवात झालेली नाही. दरम्यान, चिपी विमानतळाचे उद्घाटन 9 ऑक्टोबरला होणार आहे. त्यादिवसापासूनच विमान सेवा सुरु होणार आहे. मात्र, या विमान सेवेला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. विमानाचे कालपासून बुकिंग सुरु झाले आणि तासाभरात 20 ऑक्टोबर 2021पर्यंतचे आरक्षण फुल्ल झाले आहे.

सिंधुदुर्ग – मुंबई विमान सेवा एअर इंडियाकडून सुरु होणार

मुंबई-सिंधुदुर्ग विमान सेवेला तुफान प्रतिसाद पाहता ही सेवा अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे. मुंबई – सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग – मुंबई अशी विमान सेवा एअर इंडियाकडून सुरु होणार आहे. या विमान सेवेची ऑनलाईन तिकीट विक्री सुरु करण्यात आली आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग आणि परतीचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. अवघ्या तासाभरात 20 ऑक्टोबरपर्यंतची तिकिटे संपली.

अवघ्या तासाभरातच 20 ऑक्टोबरपर्यंतचे आरक्षण फुल्ल

सिंधुदुर्गच्या विमानसेवेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. एअर इंडियाने तिकीट विक्रीला सुरुवात केली, पण अवघ्या तासाभरातच 20 ऑक्टोबरपर्यंतचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती एअर इंडियाच्या संकेतस्थळावर दिसत आहे.

9 ऑक्टोबरपासून सिंधुदुर्गात विमान सेवा सुरू

मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासूनच हा विमान सेवेची जोरदार चर्चा सुरु होती. आता प्रत्यक्षात 9 ऑक्टोबरपासून सिंधुदुर्गात विमान सेवा सुरू होणार आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे 9 ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे. एअर इंडियाच्या ‘अलायन्स एअर’ या उपकंपनीमार्फत मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमान उडणार आहे.

मुंबई ते सिंधुदुर्गसाठी 2520 रुपये

मुंबई ते सिंधुदुर्गसाठी 2520 रुपये तर सिंधुदुर्ग ते मुंबई परतीच्या प्रवासासाठी 2621 रुपये तिकीट दर आहे. दररोज सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी मुंबईहून निघालेले विमान दुपारी 1 वाजता चिपी येथे उतरेल. तर परतीचा प्रवास दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी सुरू होईल आणि विमान 2 वाजून 50 मिनिटांनी मुंबईत पोहोचेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!