महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ महत्त्वाचे संकेत

महत्त्वाच्या बैठकीत काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : महाराष्ट्र राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच कठोर निर्णय घेण्याच्या तयारी आहे. लवकरच कडक निर्बंध लागू केले जातील, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि कोविड टास्क फोर्स यांच्यासोबत पार पडलेल्या बैठीकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे निर्देश दिलेत. त्याचबरोबर लॉकडाउनचे संकेतही अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांनी दिल्यांन चर्चांना उधाण आलंय.

हेही वाचा – Exclusive | चिफ रिपोर्टर v/s चिफ मिनिस्टर! #Politics #CMvsCR

वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि कोविड टास्क फोर्स यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सूचना केली आहे की,

जर लोकं करोना संबंधित नियमांचे सातत्याने उल्लंघन करत असतील, तर लॉकडाउनसारख्या निर्बंधांसाठी तयार रहा. लोकं मार्गदर्शक सूचनांचे गांभीर्याने पालन करत नसल्याने करोना रूग्णसंख्या वाढत आहे. म्हणून लॉकडाउन सारखी कठोर पावल विचारात घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाउनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्याचं वृत्त लोकसत्ता डिजीटल टीमनं दिलं आहे. यासंदर्भात आज आयोजित या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाउन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली.

हेही वाचा – बंपर नोकरभरती… कुठे किती जागा? अप्लाय कसं कराल? वाचा सगळे डिटेल्स

बैठकीत निर्णय काय झाले?

१.मर्यादित दिवसांसाठी लॉकडाउन लावावे. त्याची कार्यपद्धती ( एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणे करून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल.
२.ऑक्सिजनची महत्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा
३.गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणकरण्यावर भर द्यावा
४.मृत्यू पुढे जाऊन वाढू शकतील त्यामुळे ई आयसीयू , व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे
५.प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी
६.विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत
७.सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे

गोव्यातही चिंता

राज्यातील वाढत्या सक्रिय रुग्णांची संख्या डोकेदुखी ठरु लागली आहे. गोव्यामध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चौदाशेच्या पार गेली आहे. आताच्या घडीला १ हजार ४०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर रविवारीही शंभरपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर पडलीये. दोन कोरोना रुग्ण दगावल्याचीही नोंद रविवारी करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गोव्यामध्ये नेमक्या काय हालचाली सरकारकडून कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी केल्या जातात, हेही पाहणं महत्त्वाचंय.

हेही वाचा – ब्रेकिंग! गोव्यात जमावबंदीचा आदेश! वाढत्या सक्रिय रुग्णसंख्येनं चिंतेत वाढ

हेही वाचा – Video | शिमगोत्सवाचा प्रश्न टाळून मुख्यमंत्र्यांची कलटी! #Shimgo

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!