घरासमोर खेळणारा चिमुरडा अचानक गायब, शोधाशोधीनंतर विहिरीत मृतदेह

गुरुवारी सकाळी 10 वाजताची घटना; डोंबिवलीत चिमुरड्याचा विहिरीत बुडून मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: घरासमोर खेळत असलेल्या चिमुरड्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. 5 वर्षांच्या चिमुकल्याचा विहिरीतील पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला.

पाच वर्षांचा चिमुरडा शेजारच्या विहिरीत पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीमधील खंबाळपाडा भोईरवाडी येथील सिताई नगर मध्ये घडली आहे. सिद्धार्थ गणेश कानगट्ट असे या मयत मुलाचे नाव आहे. सिद्धार्थ दिव्यांग होता. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास सिद्धार्थ नेहमीप्रमाणे आपल्या घरासमोर खेळत होता. बऱ्याच वेळाने सिद्धार्थ कोठेही दिसत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा आजूबाजूला शोध घेतला मात्र तो सापडला नाही.

सिद्धार्थचा मृतदेह विहिरीत सापडला

दुपारच्या सुमारास शेजाऱ्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता सिद्धार्थ पाण्यावर तरंगताना आढळला. नागरिकांनी तातडीने त्याला पाण्यातून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. मात्र शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हा व्हिडिओ पहाः Goa Entry Point | Patradevi Checkpost | तपासणीसाठी पत्रादेवी चेकपोस्टवर गर्दी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!