महाराष्ट्रात मोठी दुर्घटना! नवजात बालकं आगीत होरपळून दगावली, मातांचा आक्रोश

नव्या वर्षातली मोठी दुर्घटना!

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

भंडारा : कल्पना करा. नुकतंच जन्माला आलेलं बाळ दुसऱ्याच कुणाच्यातरी चुकीमुळं आगीत होरपळून दगावलं, तर?… असाच धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात घडलाय. एक-दोन नव्हे तर तब्बल दहा नवजात बालकांचा रुग्णालयाती आगीत होरपळून मृत्यू झालाय. त्यामुळे एकच हाहाकार माजलाय. नुकत्याच जन्मलेल्या बाळांनी पूर्णपणे नीट डोळेही उघडले नव्हते. हे जग पाहण्याआधीच नियतीनं चिमुकल्यांचा जीव घेतलाय.

कुणालाही हादरवेल अभी भीषण दुर्घटना महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यामध्ये घडली आहे. नवजात बालकांच्या जन्मानं प्रफुल्लीत झालेल्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. दहा नवजात बालकांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. भंडारातील जिल्हा रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीनं होत्याचं नव्हतं केलंय.

शिशु केअर सेंटरमध्ये अग्नितांडव

आज (९ जानेवारी) सकाळी महाराष्ट्रात भीषण घटना घडली. भंडारातील जिल्हा रुग्णालयात झोपेमध्ये असणाऱ्या कोवळ्या जिवांना काळानं कवेत घेतलं. शिशु केअर युनिटमध्ये १७ चिमुकल्यांपैकी दहा जणांचा अंत झालाय. धक्कादायक बाब म्हणजे सात चिमुकल्यांचा श्वास न घेता आल्यानं त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला. तर तीन चिमुकले आगीत होरपळले आणि त्यांचा मृत्यू झाला. इवल्याशा पावलांनी घरात येऊ पाहणारं सुख सरकारी अनास्थेनं हिरावून घेतलं असल्याचा आरोप पीडित कुटुंबांकडून करण्यात येतोय.

नुकत्याच जन्मल्या मुलांच्या कोवळ्या शरीराचे आगीनं लचके तोडलेत. ही भीषण घडना घडल्यानंतर नवजात बालकांच्या मातांच्या आक्रोशानं रुग्णालयाच्या भिंतीहा शहारल्यात. सात मुलांना वाचवण्यात आल्याचं सांगितलं जातंय. मात्र मृत्यू झालेल्या दहा चिमुकल्यांच्या कुटुंबीयांवंर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

मदत जाहीर, जीव परत येणार का?

ठाकरे सरकारकडून या भीषण अग्नितांडवात मृत्यू झालेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. मात्र गेलेला जीव परत येणार आहे का असा उद्विग्न सवाल उपस्थित केला जातोय. तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी जाणार असल्याचं आश्वासन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलंय. दुर्घनटेत मृत्युमुखी पडलेल्या नवजात बालकांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय. दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे महाराष्ट्राच नव्हे देशातील प्रत्येक संवेदनशील माणसाच्या डोळ्यात पाणी आलंय.

हेही वाचा – VIDEO | काळजाचा ठोका चुकवणारं सीसीटीव्ही फुटेज समोर

हेही वाचा – आजीसोबत गावी जाताना देवगडमधील 8 वर्षांच्या मुलावर काळाचा घाला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!