दुर्घटना! तामिळनाडूमध्ये अंडर कन्स्ट्रक्शन उड्डाण पूलाचा भाग कोसळला

अपघातात एकाचा मृत्यू; अनेकजण जखमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

चेन्नईः येथील मदुराईच्या नाथम रोडवर एक दुर्दैवी घटना घडली आहे. या भागात अंडर कन्स्ट्रक्शन असलेला पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला.

हेही वाचाः काबुल विमानतळाच्या गेटजवळ गोळीबार; पुन्हा एकदा चेंगराचेंगरीची घटना

ढिगाऱ्याखाली दबलेल्या चार मजुरांना बाहेर काढलं

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि मदत आणि बचाव कार्य सुरू झालं. पुलाचा काही भाग कोसळताच आजूबाजूला एकच गोंधळ उडाला. माहिती पोहोचलेल्या पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली दबलेल्या चार मजुरांना बाहेर काढलं. तर या अपघातात जखमी झालेल्या इतर काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बचावकार्य सुरू

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि इतर शासकीय विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळाची पाहणी केली. सध्या या भागात बचावकार्य सुरूच आहे.

हा व्हिडिओ पहाः Politics | Congress | दोन दिवसीय दौऱ्यानंतर चिदंबरम यांची पत्रकार परिषद

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!