‘एल अँड टी’ ठरला जागतिक इंजिनियरिंग आणि बांधकाम क्षेत्रातील सर्वात बलशाली ब्रँड…

मोस्ट व्हॅल्यूएबल ग्लोबल ई अँड सी 50 ब्रँड्स अहवालात समाविष्ट असलेली एकमेव भारतीय कंपनी

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : लार्सन अँड टुब्रो (एल अँट टी) या ईपीसी प्रकल्प, हाय- टेक मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीचा ब्रँड फायनान्सतर्फे ५० ग्लोबल इंजिनियरिंग अँड कन्स्ट्रक्शन (ई अँड सी) कंपन्यांमध्ये ‘सेकंड स्ट्राँगेस्ट ब्रँड’ म्हणून समावेश करण्यात आला आहे.

एल अँड टी सध्या ५० देशांत कार्यरत

लंडन- स्थित कंपनीने आपल्या ‘इंजिनियरिंग अँड कन्स्ट्रक्शन 50- 2022’ या अहवालात एल अँड टीला ‘थर्ड फास्टेस्ट ग्रोईंग ब्रँड’चेही स्थान दिले आहे. ‘मोस्ट व्हॅल्यूएबल ग्लोबल ई अँड सी फर्म्स’मध्ये समाविष्ट करण्यात आलेली एल अँड टी ही एकमेव भारतीय कंपनी आहे. एल अँड टी सध्या ५० देशांत कार्यरत असून गेल्या वर्षभरात कंपनीच्या ब्रँड मूल्यामध्ये ४४ टक्के वाढ झाली आहे.

ब्रँड म्हणजे विश्वास, प्रतिष्ठा, मूल्य यंत्रणा आणि विश्वासार्हता असते

या सन्मानाविषयी एल अँड टीचे प्रतिनिधी म्हणाले, ‘ब्रँड हा केवळ एक नाव किंवा लोगोपेक्षा बरंच काही असतं. ब्रँड म्हणजे विश्वास, प्रतिष्ठा, मूल्य यंत्रणा आणि विश्वासार्हता असते. ब्रँड फायनान्सतर्फे इंजिनियरिंग आणि बांधकाम क्षेत्रात दुसऱ्या सर्वात बलशाली जागतिक ब्रँडचा मिळालेला हा सन्मान आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. हा सन्मान आमच्या टीमची गुणवत्तेप्रती असलेली बांधिलकी तसेच दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या आमच्या क्षमतेवर असलेला ग्राहकांचा विश्वास यांची पावती देणारा आहे.’ ‘आमचा ब्रँड तसेच व्यवसायाच्या भविष्याविषयी आम्ही उत्सुक आहोत. नव्या बाजारपेठा आणि नव्या क्षेत्रांत आम्ही सातत्याने विकास व विस्तार करत असून आम्हाला विश्वास आहे, की आम्ही या दमदार पायावर अशाच प्रकारे उभारणी करत राहू आणि जागतिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून आमचे स्थान आणखी बळकट करू.’

कंपनीचे देश व जगभरात सर्वात मोठे, लांब आणि उंच प्रकल्प

एल अँड टी ने आपल्या ब्रँडच्या ताकदीमध्ये लक्षणीय सुधारणा केली असून कंपनीचा ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स (बीएसआय) ७.१ गुणांनी वाढून १०० पैकी ८३.९ वर पोहोचला आहे. मोस्ट व्हॅल्यूएबल ग्लोबल ई अँड सी 50, 2022’ ब्रँड्समध्ये समाविष्ट असलेली एल अँड टी ही एकमेव भारतीय कंपनी आहे. ब्रँड एल अँड टी पायाभूत सुविधा, बांधकाम, हायड्रोकार्बन, अवजड अभियांत्रिकी आणि संरक्षण अभियांत्रिकी अशा महत्त्वाच्या क्षेत्रांना तंत्रज्ञानयुक्त सहाय्य करत असते. कठीण प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्याच्या कंपनीच्या प्रतिष्ठेमुळे एल अँड टीला या क्षेत्रातील उच्चभ्रू कंपन्यांमध्ये स्थान मिळालेले आहे. कंपनीचे देश व जगभरात सर्वात मोठे, लांब आणि उंच प्रकल्प आहेत, ही बाब तंत्रज्ञानाभिमुख ई अँड सी ब्रँड सहजपणे कोणतेही आव्हान पेलू शकते याचा पुरावा आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!