#Love Jihad : ‘हे’ राज्यही करणार कायदा

Goan Varta Live | प्रतिनिधी
बेंगळुरू : उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा करण्याचा विचार सुरू आहे. गेले काही महिने ‘लव्ह जिहाद’विरोधात देशातील वातवरण चांगलेच तापले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे की, त्यांचे सरकार लव्ह जिहाद संपुष्टात आणण्यासाठी कडक पावलं उचलणार आहे. आम्ही वृत्तपत्रं व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्म परिवर्तनाच्या बातम्या पाहिल्या आहेत. या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. कर्नाटकात मला हे संपवायचे आहे. येत्या दोन -तीन दिवसांत आम्ही याबाबत निर्णय घेऊ.
गृहमंत्र्यांनी दिले होते संकेत
या अगोदर कर्नाटकचे गृहमंत्री बोमानी यांनी लव्ह जिहाद विरोधात कायद्याचे संकेत दिले होते. बऱ्याच दिवसांपासून लव्ह जिहाद सुरू आहे, असे त्यांनी म्हटले होते. या संदर्भात आम्ही कायदेतज्ज्ञांशी चर्चा करत आहोत, असे ते म्हणाले होते.