‘या’ राज्यात लॉकडाऊन वाढवला!

आता 16 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी विविध राज्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारनेदेखील लॉकडाऊनची घोषणा केली होती. आता सोमवारी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ट्विट करत लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा केली आहे.

हेही वाचाः ‘आप’कडून राज्यात २४० ऑक्सिजन तपासणी केंद्रांची सुरुवात

16 जूनपर्यंत वाढला लॉकडाऊन

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा सोमवारी केलीये. केरळ सरकारने राज्यातील लॉकडाऊन 16 जूनपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली आहे. या काळात कोविडचे चालू असलेले निर्बंध कायम ठेवले जातील. त्यामुळे लोकांना लॉकडाऊन नियमावलीचं पालन करून घरातच थांबण्याचे आदेश मुख्यमंत्री विजयन यांनी दिलेत.

हेही वाचाः अखेर चिकन मार्केटजवळील ‘तो’ कचरा नगरपालिकेने हटवला

आवश्यक सेवा सुरू

या लॉकडाऊनमधून आवश्यक सेवांना सूट देण्यात आलीये. जीवनावश्यक वस्तू, उद्योगांसाठी कच्चा माल (पॅकेजिंगसह), बांधकाम साहित्य विकणारी स्टोअर्स तसंच आणि बँका आताप्रमाणेच कार्यरत राहतील असं मुख्यमंत्री विजयन ट्विटमध्ये म्हणालेत.

हेही वाचाः भाजप सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ सुरूच

कोरोना अजून गेला नाही, काळजी घ्या

देशात कोरोनाची आकडेवारी कमी होतेय. मात्र तो अजून पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घेणं आवश्यक आहे. शक्यतो अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडणं टाळा. बाहेर पडल्यानंतर कोविड एसओपींचं पालन करताना मास्क वापरा, सामाजिक अंतर राखा आणि हातांची स्वच्छता पाळा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!