LIVE Video | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात गदारोळाने

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु

Goan Varta Live | प्रतिनिधी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली ती प्रचंड गदारोळाने. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मंत्र्यांची ओळख करुन देण्यासाठी उभे राहिले होते. विरोधकांकडून यावेळी गदारोळ घातला जात असल्याने मोदींनी त्यांच्यावर निशाणा साधला. इतक्या महिला, दलित आणि आदिवासींना मंत्री बनवण्यात आल्यानंतर संसदेत उत्साह असेल असं मला वाटलं होतं असा टोला यावेळी त्यांनी लगावला. दरम्यान, प्रचंड गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!