मोठी बातमी! मंगळुर जंक्शन ते ठोकूर दरम्यान कुलशेकर बोगद्याजवळ दरड कोसळली

कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम; रेल्वे मार्ग लवकरात लवकर मोकळा करण्यासाठी कामगारांना आदेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी हाती येतेय. कर्नाटकातील मंगळुर जंक्शन ते ठोकूर दरम्यान कुलशेकर बोगद्याजवळ दरड कोसळली असल्याचं समजतंय. ही घटना शुक्रवारी घडलीये. या घटनेमुळे कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

हेही वाचाः श्रीपाद नाईक स्थानिक राजकारणात येणार?

कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम

कुलशेकर-पाडिल पट्ट्यावरील बोगद्याजवळ ही दरड कोसळली आहे. भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत रेल्वे रुळावरून माती काढून रेल्वे रूळ मोकळा केला जात नाही तोपर्यंत कोकण मार्गावरील सर्व गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. मंगळुरू-ठोकूर विभाग दक्षिण रेल्वेच्या कक्षेत येतो आणि कोकण रेल्वे ठोकूरपासून सुरू होते.

रेल्वे मार्ग मोकळा करण्याचे रेल्वे विभागाकडून कामगारांना आदेश

रेल्वे विभागाकडून ट्रॅकजवळ प्रतिबंधात्मक संरक्षक भिंत बांधली होती. परंतु मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने सगळी माती रेल्वे रूळावरून येऊन जमा झाली आहे. या रेल्वे मार्गावरील माती काढून मार्ग लवकरात लवकर मोकळा करण्याबाबत रेल्वे विभागाकडून कामगारांना आदेश देण्यात आलेत.

हेही वाचाः पिळगाव येथे वाचनालयाची भिंत कोसळली

गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळली असल्याचं बोललं जातंय.

हा व्हिडिओ पहाः FARMERS | रस्त्याच्या दुतर्फा साचलेल्या पाण्यामुळे शेतीचं नुकसान

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!