थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार करायचीये? अशी करा तक्रार…

तक्रारीत तथ्य आढळल्यास थेट पंतप्रधान कार्यालयाकडून संबंधित अधिकाऱ्यावर होणार कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: एखाद्या कामासाठी सरकारी कार्यालयात खेटे मारूनही ते काम पूर्ण न होण्याची बाब काही नवीन नाही. सरकारी बाबूंचा आळशीपणा आणि दुर्लक्षामुळे सामान्य लोकांची अनेक कामं अडकून पडतात. अशा परिस्थितीत सामान्य लोकांनी नक्की कोणाकडे तक्रार करायची, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, आता सामान्य लोकही वरिष्ठ अधिकाऱ्यांची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करु शकतात. त्यासाठी तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन तक्रार पाठवता येईल. या तक्रारीत तथ्य आढळल्यास थेट पंतप्रधान कार्यालयाकडून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल.

हेही वाचाः ACCIDENT | फिलिपिन्समध्ये विमान दुर्घटना

पंतप्रधान कार्यालयात तक्रार कशी कराल?

पंतप्रधान कार्यालयात तक्रार करण्यासाठी प्रथम https://www.pmindia.gov.in/hi या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर पंतप्रधानांशी संवाद साधण्याच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. त्यासोबत संबंधित कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर दिला जाईल.

हेही वाचाः CURFEW | अखेर व्यावसायिक, व्यापाऱ्यांना दिलासा

पत्राद्वारेही तक्रार करू शकता

ज्यांना कॉम्प्युटर हाताळता येत नसेल ते लोक पत्र लिहूनही पंतप्रधान मोदींपर्यंत आपली तक्रार पोहोचलू शकतात. त्यासाठी प्रधान मंत्री कार्यालय, साउथ ब्लॉक, नवी दिल्ली, पिन – 110011, या पत्यावर पत्र पाठवावं. तसंच FAX No. 011-23016857 या फॅक्स नंबरवरही तुम्हाला तक्रार पाठवता येईल.

हेही वाचाः सर्वोच्च न्यायालयात 6 जुलै रोजी खाण याचिकांवर सुनावणी

कशाप्रकारे होते कारवाई?

पंतप्रधान कार्यालयात दररोज अनेक तक्रारी येत असतात. या तक्रारींसंदर्भात कारवाई करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात एक टीम काम करते. याशिवाय, CPGRAMS माध्यमातूनही तक्रारींचं निवारण करता येतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!