अक्षम्य! चिमुकल्यांना पोलिओ डोजऐवजी पाजले सॅनिटायझर

घाटंजी तालुक्यातील भांबोर येथे शासकीय रुग्णालयातील घटना

Goan Varta Live | प्रतिनिधी

यवतमाळ: घाटंजी तालुक्यातील भांबोर येथे शासकीय रुग्णालयाच्या पोलिओ केंद्रावर रविवारी पोलिओ डोज पाजण्याऐवजी चक्क सॅनिटायझर देण्यात आले. एक नव्हे तब्बल १२ मुलांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला. याची चौकशी सुरू असून प्रकरण पोलिसांकडे देण्यात आले आहे.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणा

सकाळी 10 वाजता कापसी येथे पोलिओ लसीकरणा चा कार्यक्रम भांबोरा पीएससी मार्फत राबविण्यात आले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे गावातील 12 मुलांना पोलिओच्या जागी सॅनिटाइजर पाजण्यात आलं. काही तासा नंतर 3 ते 4 मुलांना उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. आई – वडील घाबरले. त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसंच ताबडतोब सर्व मुलांना यवतमाळ येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना माहीत होताच एम.डी.सिंह कलेक्टर साहेब यांनी रात्री 12 वाजता येऊन सर्व रुग्णाना भेट दिली.

यासंदर्भात कापसीचे सरपंच युवराज मरापे यांनी प्रतिक्रिया दिली असून, दोषींवर कारवाई केली जावी अशी पालकांची मागणी असल्याचे म्हटले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.