एकच नंबर! वयाच्या अवघ्या 21 वर्षी बनणार महापौर

जर केरळमध्ये होऊ शकतं तर गोव्यात का नाही?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात पालिका निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. पण त्याआधी एक बातमी संपूर्ण देशात ट्रेन्ड होताना पाहायला मिळतेय. अवघ्या २१व्या वर्षी एक तरुणी महापौरपदी विराजमान होणार आहे. सर्वात तरुण महापौर म्हणून या तरुणींच्या नावे विक्रमही नोंदवला जाणार आहे. नेमकी कोण आहे ही तरुणी आणि ती कोणत्या पालिकेची महापौर होणार आहे, ते जाणून घेऊयात.

नवा रेकॉर्ड

केरळमध्ये नुकत्याच महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत तिरुवनंतपुरम महापालिकेत मुडवणमुगल वार्डातून आर्या राजेंद्रन ही 21 वर्षीय तरुणी विजयी झाली. ती आता तिरुवनंतपुरम महापालिकेची महापौर होणार आहे. आर्या राजेंद्रननं महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर ती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विक्रम मोडणार आहे. देवेंद्र फडणवीस वयाच्या 27 व्या वर्षी महापौर झाले होते. देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावावर आहे. अवघ्या २१ व्या वर्षी महापौर होण्याची किमया आर्यानं करुन दाखवली आहे. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

आर्या सध्या ऑल सेंटस कॉलेजमध्ये बीएस्सी मॅथ्सचे शिक्षण घेतेय. आर्या राजेंद्रन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणुकीत विजयी झाली आहे. तसंच ती स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची राज्य कार्यकारिणीची सदस्य सुद्धा आहे.

सामान्य कुटुंबातली असमान्य मुलगी

आर्या राजेंद्रन सीपीएमच्या ब्रँच कमिटी सदस्य असून बालाजनसंघम प्रदेशाची अध्यक्ष आहे. आर्याचे वडील इलेक्ट्रिशीयनचे काम करतात. तिची आई श्रीलथा एलआयसी एजंट म्हणून काम करते. केरळमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांच्या लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रंटने विजय मिळवला आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत एलडीएफ प्रथम क्रमांकावर, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

गोव्यात काय घडणार?

राज्यातही लवकरच पालिका निवडणुका जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. अशातच येत्या निवडणुकांमध्ये केरळमध्ये जे घडलं ते गोव्यातही शक्य आहे का, अशी चर्चा रंगली आहे. तरुणांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन हा नेहमीच वादावा विषय राहिला आहे. अशातच एका तरुणीनं पालिका निवडणुकीत केलेली दमदार कामगिरी सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का देणारी अशी ठरली आ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!